Coroanvirus: गेल्या 24 तासांत देशभरात 1,00,636 कोरोना रुग्णांची नोंद, मृतांच्या संख्येत लक्षणीय घट

आतापर्यंत देशातल्या तीन लाख 49 हजार 186 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. | Coronavirus in India

Coroanvirus: गेल्या 24 तासांत देशभरात 1,00,636 कोरोना रुग्णांची नोंद, मृतांच्या संख्येत लक्षणीय घट
कोरोना व्हायरस

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट आता वेगाने ओसरताना दिसत आहे. कारण रविवारी दिवसभरात देशात 1,00,636 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही निचांकी रुग्णंसख्या आहे. तर दुसरीकडे कोरोना (Cornavirus) मृतांची संख्याही घटताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात 2427 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाची साथ शिगेला असताना मृतांचा दैनंदिन आकडा हा 4500 पेक्षा जास्त होता. मात्र, आता हे प्रमाण तीन हजाराच्याखाली येणे, अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. (Coronavirus new patients in India)

आतापर्यंत देशातल्या तीन लाख 49 हजार 186 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातला मृत्युदर आता 1.21 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर देशातला रुग्ण बरे होण्याचा दर 93.94 टक्के झाला आहे.


देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,00,636

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,74,399

देशात 24 तासात मृत्यू – 2427

एकूण रूग्ण – 2,89,09,975

एकूण डिस्चार्ज –2,71,59,180

एकूण मृत्यू – 3,49,186

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 14,01,609

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 23,27,86,482

देशातील 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

देशातील 23 कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 13 लाख 90 हजार 916 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी 13 लाख 11 हजार 161 नागरिकांनी पहिला तर 79 हजार 755 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या 23 कोटी 27 लाख 86 हजार 482 वर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या :

सरकारला ब्लू टिकचं पडलंय, लोकहो, तुम्हीच तुमच्या लसीची व्यवस्था करा; राहुल गांधींची खोचक टीका

नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता

(Coronavirus new patients in India)