AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ऐन युद्धात भारताचा अमेरिकेला मोठा झटका, ट्रम्प हात चोळत बसले, शेवटी भारताने तो निर्णय घेतलाच

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! ऐन युद्धात भारताचा अमेरिकेला मोठा झटका, ट्रम्प हात चोळत बसले, शेवटी भारताने तो निर्णय घेतलाच
trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 3:09 PM
Share

इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मूजची सामुद्रधुनी बंद केली आहे. जगातील जवळपास 25 टक्के कच्चं तेल आणि एलपीजी गॅसची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे सध्या जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. मात्र दुसरीकडे या युद्धामुळे आता भारताचा फायदा होताना दिसत आहे. याबाबत तेल मंत्रालयाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. भारताने आता इराणकडून तेलाची खरेदी केली आहे. यामुळे तूर्तास तरी भारतावरील ऊर्जा संकट टळलं आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. मे 2019 नंतर अमेरिकेच्या दबावामुळे भारतानं इराणकडून एकाही तेलाच्या जहाजाची खरेदी केली नव्हती. मात्र त्यानंतर आता अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे पुरवठा साखळी बाधित झाली आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडत आहे, त्यामुळे आता भारतानं पुन्हा एकदा इराणकडून तेल खरेदी सुरू केली आहे.

याबाबत तेल मंत्रालयाकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. ‘मध्य पूर्वेतील पुरवठा साखळी बाधित झालेली असताना देखील भारतानं मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. त्यामुळे देशावरील ऊर्जा संकट दूर झालं आहे. भारतानं इराणकडून देखील तेलाची खरेदी केली आहे. आयातीचे देयक देण्यामध्ये देखील कोणतीच अडचण नाहीये.’ अशी माहिती मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या महिन्यात जागात ऊर्जा संकट निर्माण होऊ नये, यासाठी अमेरिकेकडून इराणच्या कच्च्या तेलावर घालण्यात आलेले प्रतिबंध देखील हटवण्यात आले आहेत. त्यामुळे याचा देखील भारताला मोठा फायदा होताना दिसत आहे. पुढील काही महिन्यांसाठी भारतानं आपली ऊर्जेची गरज पूर्ण केल्याचा दावा देखील तेल मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

भारत सध्या जवळपास 40 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करत आहे, त्यामुळे भारत सरकारकडून रिफायनरी कंपन्यांना तेल खरेदीबाबत पूर्णपणे सूट देण्यात आली आहे, त्यांना जिथून कच्चं तेल अधिक स्वस्त वाटत असेल तिथून ते तेलाची खरेदी करू शकतात, असं सरकारने म्हटलं आहे. दुसरीकडे रशियाकडून देखील भारताला मोठी ऑफर देण्यात आली आहे, भारताला जेवढी गरज असेल तेवढ्या प्रमाणात कच्चं तेल पुरवण्याची तयारी रशियानं दाखवली आहे, त्यामुळे भारताला याचा मोठा फायदा होणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा