AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जदयू’ची 15 वर्षातील सर्वात खराब कामगिरी; मुख्यमंत्रिपदावरुन नितीश कुमारांचे मन उडाले, भाजपकडून मनधरणी

चिराग पासवान यांच्या 'लोजप'ने ज्याप्रकारे संयुक्त जनता दलाचे नुकसान केले आहे, त्याचा मोठा धक्का नितीश यांना बसला आहे. | Nitish Kumar

'जदयू'ची 15 वर्षातील सर्वात खराब कामगिरी; मुख्यमंत्रिपदावरुन नितीश कुमारांचे मन उडाले, भाजपकडून मनधरणी
| Updated on: Nov 12, 2020 | 8:05 AM
Share

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाच्या (JDU) निराशाजनक कामगिरीमुळे नितीश कुमार प्रचंड व्यथित झाले आहेत. त्यामुळे आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, असे त्यांनी भाजपला बोलूनही दाखवले. मात्र, भाजपच्या नेत्यांकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. (Sources said JDU leader Nitish Kumar don’t want to be CM again )

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या माहितीनुसार, नितीश यांनी आता मुख्यमंत्रिपदात रस नसल्याचे सांगितल्यानंतर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या नेत्यांनी नितीश यांची समजूत काढली. ‘जदयू’ला कमी जागा मिळाल्या असल्या तरी तुम्हाला सरकार चालवताना पूर्वीप्रमाणेच पूर्ण स्वातंत्र्य असेल, अशी हमी भाजपच्या नेत्यांनी नितीश यांना दिल्याचे समजते.

तत्पूर्वी बुधवारी नितीश कुमार यांनी एक ट्विट केले होते. जनता ही सर्वोच्च असते. ‘एनडीए’ला दिलेल्या बहुमताबद्दल मी जनतेचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यासाठीही मी ऋणी असल्याचे नितीश यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्या ‘लोजप’ने ज्याप्रकारे संयुक्त जनता दलाचे नुकसान केले आहे, त्याचा मोठा धक्का नितीश यांना बसला आहे. जवळपास 25 ते 30 जागांवर चिराग पासवान यांनी ‘जदयू’चे गणित बिघडवून टाकले. परिणामी ‘जदयू’ला गेल्या 15 वर्षात प्रथमच इतक्या कमी जागा मिळाल्या आहेत. ही गोष्ट नितीश यांच्या मनाला चांगलीच लागली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना आता मुख्यमंत्रिपदी बसण्याची इच्छा उरलेली नाही. मात्र, भाजपच्या नेत्यांकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांसह ‘एनडीए’ने बहुमत प्राप्त केले आहे. यामध्ये भाजपला 74 तर ‘जदयू’ला 43 जागा मिळाल्या आहेत. तर ‘व्हीआयपी’ आणि ‘हम’ या दोन घटकपक्षांना प्रत्येकी चार चागांवर विजय मिळाला आहे. 2015 मध्ये ‘जदयू’ला 71 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ‘जदयू’ची यंदाची कामगिरी ही गेल्या 15 वर्षातील खराब कामगिरी ठरली आहे.

भाजपने चिराग पासवानांना न रोखल्याने ‘जदयू’च्या नेत्यांमध्ये नाराजी निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपने चिराग पासवान यांच्या ‘लोजप’ला आवर घातला नाही. याशिवाय, भाजप आणि ‘जदयू’च्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. परिणामी अनेक जागांवर ‘जदयू’च्या उमेदवारांचा पराभव झाला. जय कुमार सिंह, शैलेश कुमार, कृष्णनंदन वर्मा, रामसेवक सिंग, संतोष निराला, खुर्शिद आलम हे ‘जदयू’चे बडे नेते ‘लोजप’मुळे हारले.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये नितीश कुमारांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झाले: रोहित पवार

‘जीत का उन्माद नही, हार का अवसाद नही, हेच आमचं धोरण’; मोदींनी सांगितला विजयाचा मंत्र

‘नितीशजी तेजस्वीला आशीर्वाद द्या, बिहारमधून बाहेर पडा; भाजपची साथ सोडून आमच्यासोबत चला’

(Sources said JDU leader Nitish Kumar don’t want to be CM again )

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.