AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेपी नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी बंगाल पोलिसांकडून 3 एफआयआर दाखल, 7 जण अटकेत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखड यांनी गंभीरपणे दखल घेतल्यानंतर बंगाल पोलीस आता अॅक्शन मोडवर आहेत.

जेपी नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी बंगाल पोलिसांकडून 3 एफआयआर दाखल, 7 जण अटकेत
| Updated on: Dec 11, 2020 | 4:42 PM
Share

कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखड यांनी गंभीरपणे दखल घेतल्यानंतर बंगाल पोलीस आता अॅक्शन मोडवर आहेत. बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पोलिसांकडून तीन ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तसेच आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेकप्रकरणी बंगाल पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तसेच बंगाल पोलिसांनी भाजप नेते राकेश सिंह यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. सिंह यांच्याविरोधात जमावास भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. (JP Nadda’s convoy attacked : Bengal Police register three FIR’s and arrested seven)

बंगाल पोलिसांनी सांगितले की, जेपी नड्डा यांच्या ताफ्याला ‘Z’ दर्जाची सुरुक्षा दिली होती. त्यासोबतच पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षादेखील प्रदान केली होती. जेपी नड्डा यांच्या ताफ्याच्या मार्गातील रस्ते आणि कार्यक्रमांच्या ठिकाणांवर चार अॅ़डिशनल एसपी, आठ डेप्युटी एसपी, आठ पोलीस निरीक्षक, 30 अधिकारी, 40 RAF चे जवान, 145 कॉन्स्टेबल आणि 350 CV तैनात केले होते.

जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे गुरुवारी (10 डिसेंबर) बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात जात होते. यावेळी जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दक्षिण 24 परगणामध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषचा आरोप आहे की टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली. सुरक्षा यंत्रणांनी जेपी नड्डा याच्या ताफ्याला सुरक्षित बाहेर काढलं.

सुरक्षा असतानाही हल्ला झालाच कसा?: ममता

नड्डा यांच्यावरील हल्ला ही नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात असताना नड्डा यांच्यावर हल्ला होईलच कसा? असा सवाल करतानाच या हल्ल्याचे व्हिडीओ भाजपने तयार केलेच कसे? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपच्या रॅलीला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांना रॅलीमध्ये खेचून आणण्यासाठीच हल्ल्याची योजना केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच शेतकरी आंदोलनावरून लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा

प. बंगालमध्ये आम्ही 200 हून अधिक जागा जिंकू; जेपी नड्डा यांचा दावा

बंगालची लढाई पुन्हा, ममता विरुद्ध ‘बाहरी’? काय काय घडतंय?

(JP Nadda’s convoy attacked : Bengal Police register three FIR’s and arrested seven)
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.