कॅराओके अॅपवरील सहगायक दुर्लक्ष करत असल्याने विवाहित महिलेची आत्महत्या

एका गाण्याच्या अॅप्लिकेशनवर ओळख झालेला सहगायक आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याने बंगळुरुत एका विवाहित महिलेने आत्महत्या (woman suicide after fight with friend) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (27 सप्टेंबर) या महिलेने (वय 35)स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कॅराओके अॅपवरील सहगायक दुर्लक्ष करत असल्याने विवाहित महिलेची आत्महत्या

बंगळुरू : एका गाण्याच्या अॅप्लिकेशनवर ओळख झालेला सहगायक आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याने बंगळुरुत एका विवाहित महिलेने आत्महत्या (woman suicide after fight with friend) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (27 सप्टेंबर) या महिलेने (वय 35)स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या महिलेला दोन मुलंही आहेत (Karnataka Married woman suicide).

ही घटना कर्नाटकच्या चिक्काबालापुरा येथे घडली. शनिवारी सकाळी ही महिला तिच्या पतीचा फोन उचलत नव्हती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेने शुक्रवारी उशिरा रात्री आत्महत्या केली असावी (Karnataka Married woman suicide). पोलिसांना घटनास्थळावरुन आत्महत्येपूर्वी या महिलेने लिहिलेलं पत्र आढळलं. यामध्ये महिलेने तिच्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नसल्याचं स्पष्ट केलं, तसेच तिने तिच्या पतीला जे प्लंबर आहेत त्यांना दोन्ही मुलांची काळजी घ्या, असंही म्हटलं आहे.

या महिलेला गाण्याची आवड होती. ती Smule या कॅराओके अॅप्लिकेशनवर गाणे गायची. या अॅपवर तिची एका माणसाशी ओळख झाली. त्यानंतर ते दोघेसोबत या अॅपवर गाणे गायचे. त्यांनी सोबत गायलेले गाणे अनेकांना आवडायचे देखील. या महिलेचे Smule या कॅराओके अॅप्लिकेशनवर 18000 फॉलोव्हर्स होते आणि तिने आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

काही दिवसांनंतर या महिलेने तिच्या या अॅपवरील सहगायकाला फोन नंबर दिला, तसेच ते दोघे फेसबुक फ्रेंडही झाले. मात्र, काही काळाने तिच्या सहगायकाने तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. या दोघांबाबत काही वाईट कमेंट्स आल्याने त्याने महिलेशी बोलणे बंद केले, त्यामुळे या दोघांमध्ये भांडणही झालं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या :

जॉब पोर्टलवर रिझ्यूम टाकणं महागात, नोकरीच्या नावाखाली 16 लाखांची फसवणूक

पत्नीला मांडीत बसवून अभिनेत्याचं ड्रायव्हिंग, सहा जणांना उडवलं, दोघांचा मृत्यू

बलात्काराचा पुरावा नष्ट करायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

दोन मुलांना विष पाजून पती पत्नीचीही आत्महत्या, चौघांच्या मृत्यूने परिसरात खळबळ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *