आधी सिंघम म्हणून ओळख आता तामिळनाडू भाजपचे सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष, माजी IPS अधिकारी के. अन्नामलाई आहेत तरी कोण ?

कर्नाटक केडरचे पूर्व आयपीएस अधिकारी के अन्नामलाई यांची 8 जुलै रोजी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तामिळनाडू राज्यात 36 व्या वर्षात प्रदेशाध्यक्षरदापर्यंत मजल मारणारे ते सर्वात कमी वयाचे भाजप नेते आहेत.

आधी सिंघम म्हणून ओळख आता तामिळनाडू भाजपचे सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष, माजी IPS अधिकारी के. अन्नामलाई आहेत तरी कोण ?
Tamil-Nadu-BJP-Chief K. Annamalai

चेन्नई : कर्नाटक केडरचे पूर्व आयपीएस अधिकारी के अन्नामलाई ( K. Annamalai) यांची 8 जुलै रोजी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तामिळनाडूमध्ये  वयाच्या 36 व्या वर्षी प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारणारे ते सर्वात कमी वयाचे भाजप नेते आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आयपीएस अधिकारी म्हणून कर्नाटकच्या पोलीस दलात एक काळ गाजवला आहे. त्यांच्या याच बहुआयामी व्यक्तीमत्त्वामुळे सध्या के. अन्नामलाई यांची चर्चा होत आहे. (know all about Tamilnadu BJP chief K Annamalai he is former IPS known as Singham police officer in Karnataka)

मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करण्यापेक्षा जनतेची सेवा करण्यासाठी झाले आयपीएस

तसं पाहायचं झालं तर अन्नामलाई यांना कोणताही राजकीय वारसा नाही. ते करुर जिल्ह्यातील कोएंबतूर येथून एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. कोएंबतूर येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लखनऊ आयआयएममधून एमबीएचं शिक्षण घेतलं. यावेळी एमबीएचं शिक्षण घेत असताना त्यांनी उत्तरप्रदेशातील दयनीय स्थिती पाहिली. फक्त पाच रुपयांसाठी हत्या करणारे लोकसुद्धा त्यांनी या ठिकाणी पाहिले. याच कारणामुळे त्यांना समाजातील विषमता तसेच गरिबीची जाणीव व्हायला लागली. तसेच लोकांसाठी काहीतरी कारण्याची इच्छासुद्धा त्यांच्या मनात याच ठिकाणी जागृत झाली. शेवटी एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करण्यापेक्षा जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

कर्नाटकात केलेल्या कामांमुळे बनले जनतेचे सिंघम पोलीस

त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण  होत त्यांनी आयपीएस म्हणून लोकांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांची पोस्टिंग कर्नाटकमध्ये झाली. याठिकाणी कामाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनात घर निर्माण केले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती तसेच हेल्मेट वापरण्यासाठी जनगागृती म्हणून 400 विद्यार्थ्यांना घेऊन बाईक रॅलीचे आयोजन करणे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करणे, असे अनेक महत्त्वाचे उपक्रम त्यांनी कर्नाटकमध्ये राबवले. तसेच 27 मार्च 2015 मध्ये उडूपी पोलिसांनी एक सुरक्षा अ‌ॅप लाँच केले होते. या अ‌ॅपअंतर्गत लोकांना त्यांची तक्रार मांडता येत होती. या अॅपला स्थानिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या अ‌ॅपची संकल्पनादेखील तत्कालीन एसपी अन्नामलाई यांचीच होती. त्यांच्या याच कामामुळे बदली होताना लोकांनी आंदोलने केली होती.

राजीनामा देत भाजपत प्रवेश, बनले प्रदेशाध्यक्ष

पोलीस दलात दहा वर्षांची सेवा देत त्यांनी 25 मे 2019 रोजी आपल्या पदाचा राजीमाना दिला. राजीनामा दिला त्यावेळी ते बंगळुरु दक्षिणचे डीसीपी होते. यावेळी बोलताना त्यांनी माझ्या दहा वर्षांच्या काळात मला जेवढे काम करायचे होते तेवढे केलेले आहे. त्यामुळे मी आनंदी आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर 25 ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. विशेष म्हणजे नुकतीच झालेली तामिळनाडू विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं होतं. अर्वाकुरुची येथून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.

मागास प्रवर्गातील लोकांना आकर्षिक करण्यासाठी भाजपने संधी दिली

दरम्यान, के. अन्नमालाई यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे आत तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 8 जुलै रोजी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. तामिळनाडूचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांना नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान देण्यात आले आहे. मुरुगन आता मोदी सरकारमध्ये मंत्री झाले. त्यानंतर मुरुगन यांची जागा रिकामी होती. याच रिकाम्या जागेवर आता अन्नामलाई यांना नियुक्त करण्यात आले आहे. अन्नामलाई यांच्याकडे तामिळनाडू भाजपची कमान सोपवण्यामागे तेथील मागास जातींना आकर्षित करण्यासाठी भाजपने केलेला हा प्रयत्न आहे, असे अंदाज बांधले जात आहेत.

इतर बातम्या :

Parliament Monsoon Session: राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची केली मागणी

Parliament Monsoon Session: ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले…

Parliament Monsoon Session: विरोधी पक्षांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

(know all about Tamilnadu BJP chief K Annamalai he is former IPS known as Singham police officer in Karnataka)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI