मालेगाव बॉम्ब ब्लास्ट ते खासदार… कोण आहेत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर?
मालेगाव बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. मालेगावच्या भिक्कू चौकात हा ब्लास्ट करण्यात आला होता. आज या प्रकरणाचा निकाल आहे. या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या स्फोटात सहा जणांचा जीव गेला होता तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाली होती.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 ला बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर जी दुचाकी सापडली ती हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचे तपासात पुढे आले आणि पोलिसांनी त्यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय रायकर, स्वामी दयानंद पांडे, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांच्यावरही गुन्हे दाखल केली.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात हा निकाल लागणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे बालपण मध्यप्रदेशच्या चंबलमध्ये गेले. त्यांचे वडील आरएसएसचे स्वयंसेवक होते आणि पेशाने डॉक्टर देखील. आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत देखील त्या सक्रिय होत्या. आरएसएस आणि अखिल भारतीय हिंदू परिषदेमध्ये त्यांनी सक्रिय काम केले.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कोण? जाणून घ्या
स्वामी अवधेशानंद यांच्याकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी संन्यास घेतला आणि राजकारण प्रवेश केला. मात्र, मालेगावच्या बॉम्ब ब्लास्टनंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले. मकोका अंतर्गतही साध्वीवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर तो हटवण्यात आला. 2017 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मोठा दिलासा मिळाला.
मालेगाव स्फोटानंतर मला सतत यातना दिल्या
सुनील जोशी हत्याकांडमधून दिला मिळाला होता. तब्बल नऊ वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर जामिनावर बाहेर येता आले. त्यांनी सांगितले की, मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांना एक सलग 23 दिवस यातना देण्यात आल्या. यासोबतच आपल्याला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आणि जेलमध्ये टाकले, गेल्याचा आरोप त्यांनी केला. पी. चिदंबरम यांच्यावर त्यांनी काही आरोप केली. भाजपाकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना संंधी देण्यात आली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. आता आजच्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये काय निकाल येतो, यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे भविष्य ठरणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाच्या नजरा आहेत.
