प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता, देशभरात हायअलर्ट

प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला (terrorist attack plan on Republic Day) आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता, देशभरात हायअलर्ट

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला (terrorist attack plan on Republic Day) आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनावेळी देशावर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झालं आहे. आयसिसच्या (ISI) तमिळनाडू मॉड्यूलचे 4 फरार दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

या दहशतवाद्यांचे मुख्य टार्गेट राजधानी दिल्ली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बॉर्डरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफ जवानांनी ‘ऑपरेशन सर्द हवा’ सुरु केले आहे.

यामुळे जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमाभागांवर अलर्ट जारी केला आहे. या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसएफ जवानांच्या तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत.

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘हिजबुल’ या दहशतवादी संघटनेकडून ट्रेनिंग घेऊन ‘अल बद्र’चे दहशतवादी हिजबुलच्या लॉजिस्टिक सपोर्टचा वापर करुन हल्ला करु शकतात. यामुळे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी अल बद्रकडे असू (terrorist attack plan on Republic Day)  शकते.

तर दुसरीकडे अल बद्र या दहशतवादी संघटनेला पुन्हा सक्रीय करण्यासाठी एक मोठा हल्ला करु शकते. याची जबाबदारी हिजबुलचे कमांडर रियाज नायकू याला सोपवली आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 40 दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. जे भारतासाठी धोकादायक ठरु शकतात. यात अल बद्र या दहशतवादी संघटनांचाही समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज नायकू हा सध्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्याला किडनीचा आजार झाला आहे. याची जबाबदारी त्याने त्याचा साथीदार हम्माद याला दिली आहे. हम्माद हा सध्या अलबद्रची रिक्र्युटमेंट आणि ट्रेनिंगचे काम करत (terrorist attack plan on Republic Day)  आहे.