VIDEO: राज्यसभेत गोंधळ आणि महिला खासदारांना धक्काबुक्की, कोणत्या मिनिटाला काय घडलं?; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ सुरू असतानाच महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यावरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच राज्यसभेतील या गोंधळाचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. (Marshall used as ‘gender shields’ in Rajya Sabha?, video viral)

VIDEO: राज्यसभेत गोंधळ आणि महिला खासदारांना धक्काबुक्की, कोणत्या मिनिटाला काय घडलं?; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
rajyasabha
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Aug 12, 2021 | 2:47 PM

नवी दिल्ली: राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ सुरू असतानाच महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यावरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच राज्यसभेतील या गोंधळाचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. त्यातून राज्यसभेत कशा प्रकारे राडा झाला हेच स्पष्ट होत असल्याचं दिसून येत आहे. (Marshall used as ‘gender shields’ in Rajya Sabha?, video viral)

बाहेरून मार्शलला आणून खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्याच दरम्यान राज्यसभेतील गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेजही बाहेर आलं आहे. या फुटेजमधून अनेक गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहेत. विरोधक राज्यसभेतील वेलमध्ये येऊन गोंधळ घालताना दिसत आहेत. यावेळी सभागृहात मार्शल मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दिसत असून तेही खासदारांना आवर घालत असल्याचं दिसून येत आहे. या गोंधळात खासदार आणि मार्शल दरम्यान धक्काबुक्की होत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे.

कधी काय घडलं?

राज्यसभेतील तीन महिला खासदारांनी मार्शलवर मारहाण केल्याचा आरोप ठेवला आहे. फुलो देवी नेताम, अमी याज्ञिक आणि छाया वर्मा या खासदारांनी हा आरोप केला आहे. दरम्यान सरकारी सूत्रांनी राज्यसभेतील कार्यवाहिची डिटेल्स दिली आहेत. कोणत्यावेळी काय झालं आणि कोण काय करत होतं हे यातून स्पष्ट होत आहे.

06.02 PM: टीएमसी खासदार डोला सेन, शांता छेत्री यांनी सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
06.22 PM: डोला सेन यांनी पीयूष गोयल, प्रहलाद जोशी मार्ग आडवण्याचा प्रयत्न केलाय
06.26 PM: नासिर हुसैन, प्रियंका चतुर्वेदी, अर्पिता घोष यांनी वेलमध्ये येऊन कागद फाडले.
06.31 PM: फूलो देवी नेताम, छाया वर्मा यांनी महिला मार्शलला ओढण्याचा
06.33 PM: रिपुन बोरा यांनी मार्शलवरून सभागृहातील खूर्चीवर जाण्याचा प्रयत्न केला.
06.40 PM: डेरेक ओ ब्रायन यांनी सभागृहात व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केली.
07.04 PM: सभागृहाच्या नेत्याने हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, विरोधकांनी सभात्याग केला
07.05 PM: अर्पिता घोष, एम. नूर आणि डोला सेन पहिल्या बकावर उभे होते.

विरोधकांचा आरोप

राज्यसभेत इन्श्यूरन्स बिल जबरदस्तीने मंजूर केलं जात होतं. त्याला विरोध केल्याने बाहेरून मार्शलला बोलावण्यात आलं. त्यांनी खासदारांसोबत धक्काबुक्की केली. तसेच महिला खासदारांनाही निशाणा बनवलं, असा आरोप विरोधकांनी लगावला आहे.

पायी मार्च

दरम्यान, आज दीड डझन विरोधी पक्षाने संसदेपासून विजय चौकापर्यंत पायी मार्च काढला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तर, विरोधक वारंवार सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. (Marshall used as ‘gender shields’ in Rajya Sabha?, video viral)

संबंधित बातम्या:

शरद पवार म्हणाले, माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही असं पाहिलं नव्हतं, नेमकं काय घडलंय?

खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?; संजय राऊत भडकले

सरकारने आजारी माणसाला गोळी दिली, पण अर्धीच; घटना दुरुस्ती विधेयकावरून किर्तीकरांचा हल्लाबोल

(Marshall used as ‘gender shields’ in Rajya Sabha?, video viral)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें