नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने नव्या कायद्यानुसार देशातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस पाठवत काही माहिती मागवली आहे. यात कंपनीचं नाव, वेबसाईट, अॅपची माहिती आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांसह भारतातील संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांचे तपशील मागितले आहेत. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपने याच कायदेशीर तरतुदीला दिल्लीच उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. यात त्यांनी या कायद्यामुळे नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसीचं (Righ to Privacy)उल्लंघन होत असल्याचं म्हटलं. मात्र, केंद्र सरकारने राईट टू प्रायव्हसी मुलभूत अधिकार असून त्याचं उल्लंघन करण्याचा हेतू नाही, असं स्पष्टीकरण दिलंय (Modi government issue notice asking information of all social media in Inida).