नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यात बदल करत व्हॉट्सअॅपकडे मेसेजच्या उगमस्थानाची माहिती देणं बंधनकारक असेल असं म्हटलं. त्यानंतर व्हॉट्सअॅप याविरोधात थेट दिल्ली उच्च न्यायालयात गेलंय. केंद्राच्या या निर्णयामुळे ‘राईट टू प्रायव्हसीचा’ (Righ To Privacy) भंग होतो, असं म्हणत व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारच्या या कायद्यालाच आव्हान दिलंय. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने यावर खासगीपणाचं उल्लंघन करण्याचा हेतू नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तसेच आम्हाला केवळ काही मेसेजची माहिती हवी असल्याचं नमूद केलंय (WhatsApp challenge new IT rules of Modi Government on right to privacy in Delhi High court).