AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान आता भारताची पत्नी बनला, तुम्ही जा अन्… खासदाराने केलेल्या विधानाची चर्चा!

संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर विस्तृत चर्चा झाली. विरोधकांनी या मोहिमेविषयी सरकारला अनेक प्रश्न विचारले.

पाकिस्तान आता भारताची पत्नी बनला, तुम्ही जा अन्... खासदाराने केलेल्या विधानाची चर्चा!
operation sindoor and hanuman beniwal
| Updated on: Jul 29, 2025 | 8:34 PM
Share

Operation Sindoor : संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर विस्तृत चर्चा झाली. विरोधकांनी या मोहिमेविषयी सरकारला अनेक प्रश्न विचारले. तर सरकारनेही विरोधकांच्या सर्व शंकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. याच गंभीर विषयावर भाषण करताना एका खासदाराने केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे. पाकिस्तान हा भारताची बोयको झाला आहे. त्यामुळे आता या देशाला घरी परत आणा, असं विधान त्यांनी केलंय.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे प्रमुख तथा नागौर मतदारसंघातून खासदार असलेले हनुमान बेनिवाल ऑपरेशन सिंदूर या विषयावर संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा भारताची पत्नी म्हणून उल्लेख करताच सभागृहात हशा पिकला.

हे नाव ऐकून असं वाटतंय की…

बेनिवाल 28 जुलै रोजी संसदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारताने आता पाकिस्तानला नमवले आहे. तुम्ही भारतीय सैन्याने राबवलेल्या या मोहिमेचे नाव ऑपरेशन सिंदूर असे ठेवले आहे. हे नाव ऐकून असं वाटतंय की भारत पाकिस्तानच्या केसांमध्ये सिंदूर लावत आहे, असे भाष्य बेनिवाल यांनी केले.

पाकिस्तान आता भारताची पत्नी बनला

तसेच पुढे बोलताना हिंदू मान्यतांनुसार एक महिला आपल्या सिंदूरला पती मानते. भारताने आता पाकिस्तानवर सिंदूर लावला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता भारताची पत्नी बनला आहे. तुम्ही जा आणी पाकिस्तानला घरी घेऊन या, बेनिवाल यांच्या याच विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधक सर्वजण हसायला लागले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवरही टीका

दरम्यान, 29 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत एका तासापेक्षा जास्त वेळ ऑपरेशन सिंदूर, भारताची भूमिका यावर भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी  भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवरही टीका केली. नेहरूंनी केलेल्या चुका आम्ही दुरुस्त केल्या असेही मोदी म्हणाले. संपूर्ण देशाला सैन्याच्या या कारवाईचा अभिमान आहे, पण काँग्रेसबाबत मात्र आम्हाला माहिती अशी बोचरी टीकाही मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणात केली.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.