AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणार साऊंड प्रुफ, अन् निसर्गाचा नजाराही पाहता येणार

जपानच्या सहकार्याने सुरु असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गावर मानवीवस्तीत ध्वनी प्रदुषण होऊ नये म्हणून आतापर्यंत 100 किमी वायडक्टवर ध्वनीप्रदुषणाचा त्रास होऊ नये म्हणून 200,000 नॉईज बॅरियर इन्स्टॉल करण्यात आलेले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणार साऊंड प्रुफ, अन् निसर्गाचा नजाराही पाहता येणार
Mumbai-Ahmedabad Bullet Train
| Updated on: Dec 23, 2024 | 5:29 PM
Share

मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या 508 किमीच्या मार्गाच्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा 100 किमीचा वायडक्ट बांधून पूर्ण झाला आहे. बुलेट ट्रेन दर ताशी 320 किमी वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर दोन तासांत कापता येणार आहे. मात्र, बुलेट ट्रेनचा वेग जास्त असल्याने ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठी या मार्गावर नॉईज बॅरियर बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत 100 किमी वायडक्ट मार्गावर 200,000 नॉईज बॅरियर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

निसर्गाचा नजाराही पाहता येणार

बुलेट ट्रेनच्या प्रचंड वेगामुळे हवेचा प्रतिरोधाने होणारा ध्वनी आणि चाकांच्या घर्षणाने होणारा ध्वनी कमी करण्यासाठी हे ध्वनिरोधक बसविण्यात येत आहेत. या प्रत्येक ध्वनिरोधकांची उंची दोन मीटर तर रुंदी 1 मीटर इतकी आहे. त्याचे वजन 830-840 किलोग्रॅम आहे. निवासी आणि शहरी भागात तीन मीटरच्या उंचीचे बॅरियर्स बसविण्यात आले आहे. यात दोन मीटर काँक्रीट बॅरीयरच्यावर एक अतिरिक्त पारदर्शक पॉली कार्बोनेट पॅनल बसविण्यात येणार आहे.त्यामुळे बुलेट ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेरील निसर्गाचा नजारा पाहाता येणार आहे.

या बॅरियर्सचा पुरवठा वेळेत व्हाया यासाठी सहा विशेष कारखान्याची निर्मिती केलेली आहे. यातील तीन कारखाने अहमदाबाद येथे तर उर्वरित तीन कारखाने सुरत, वडोदरा आणि आणंद येथे स्थापन केले आहेत. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या योजनेतील प्रमुख कामे वेगाने होत आहेत. 243 कि.मी. हून अधिक वायाडक्टची ( उन्नत मार्गाची ) निर्मिती पूर्ण झालेली आहे.352 कि.मी.मार्गावरील खांब उभारण्याचे काम आणि 362 कि.मी. च्या खांबांच्या पाया टाकण्याचे काम झाले आहे.13 नद्यांवरील पुलांचे काम पूर्ण झालेले आहे.त्यापैकी पाच स्टीलचे ब्रिज तर दोन स्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) ब्रिज आहेत.

बीकेसी भूयारी स्थानक आणि समुद्री बोगदा

मुंबईतील बीकेसी येथे बुलेट ट्रेनच्या भूयारी स्थानकासाठी पहिला काँक्रीट बेस-स्लॅब 32 मीटर खोलवर यशस्वीपणे टाकण्याचे काम झाले आहे. याची उंची दहा मजली इमारती इतकी खोल आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ( बीकेसी )आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या समुद्री बोगद्याचे काम सुरु आहे. मुख्य बोगद्याच्या निर्मितीकरीता सोय होण्यासाठी 394 मीटर लांबीचा इंटरमीडिएट बोगदा (ADIT) खणण्याचे काम पूर्ण झाले आहे.

प्रचंड रखडलेला प्रकल्प

गुजरातमधील अहमदाबाद येथे बुलेट ट्रेनच्या मार्गाचे भूमिपूजन साल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 सप्टेंबर 2017 रोजी झाले होते.  508 किमीच्या या मार्गाचा 348 किमी मार्ग गुजरातच्या हद्दीत तर 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रात येतो. गुजरातच्या आणंद, वडोदरा, सूरत आणि नवसारी जिल्ह्यात आरसी ट्रॅक बेडची निर्मितीचे काम सुरु आहे.71 किलोमीटर आरसी ट्रॅक बेडचे काम पूर्ण झालेले आहे. आणि वायडक्टवर रेल्वे रुळांचे वेल्डींग सुरु झाले आहे. पालघर जिल्ह्यात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM)वापर करुन डोंगरात सात बोगद्यांचे काम सुरु आहे. गुजरातमधील एकमेव बोगद्याचे काम आधीच पूर्ण झालेले आहे. या बुलेट मार्गावर 12 स्टेशन आहेत. त्यातील केवळ चार महाराष्ट्रात आहेत. त्यांचे डिझाईन स्थानिक वैशिष्ट्यांनुसार केलेले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प कोरोना आणि राज्यातील सत्ताबदल या कारणाने प्रचंड रखडला असून 1.1 लाख कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या प्रकल्पाची पहिली चाचणी बिलीमोरा ते सुरत या मार्गावर साल 2026 रोजी होणार असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ( NHSRCL )अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.