AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai-Ahmedabad Bullet Train : कोलक नदीवरील पुलाचे काम पूर्ण, एकूण 24 नदी पुलांवरुन धावणार बुलेट ट्रेन

मुंबई ते अहमदाबाद या 508 किमीच्या बुलेट ट्रेनचा मार्गात अनेक नद्या येणार असल्याने एकूण 24 नदी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी महाराष्ट्रात चार नदी पुलांची बांधणी सुरु झाली आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train : कोलक नदीवरील पुलाचे काम पूर्ण, एकूण 24 नदी पुलांवरुन धावणार बुलेट ट्रेन
River bridge on Kolak River, Valsad district, Gujarat has been completed for the Bullet Train project.
| Updated on: Jul 16, 2024 | 5:03 PM
Share

मुंबई ते अहमदाबाद महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन एकूण 24 नदीपुलांवरुन धावणार आहे. गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे.  एकूण 24 नदीपुलांवरुन बुलेट ट्रेन जाणार आहे.  यातील नऊ नदी पुलांचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात नद्यांवर चार पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात दोन पुलांची उभारणी उल्हास नदीवर तर एका पुलाची उभारणी वैतरणा नदीवर अन्य एका पुलाची उभारणी जगनी नदीवर होत असून या तिन्ही नद्या पालघर जिल्ह्यातील आहेत. बुलेट ट्रेनचा बिलीमोरा ते सुरत असा पहिला टप्पा साल 2026 मध्ये सुरु होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोलक नदीवरील नदी पुलाचे काम पूर्ण झाल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉरीडॉरने म्हटले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील या नदीपूलाची बांधणी सुरु होती आता तो पूर्ण झाला आहे. या कोलक नदीवरील पुलाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पुलाची लांबी 160 मीटर इतकी आहे. यात चार फूल स्पॅन गर्डरचा ( प्रत्येकी 40 मीटर ) वापर करण्यात आला आहे. पिअर्सची उंची 14 ते 23 मीटर इतकी आहे. एका खांबाचा व्यास पाच मीटर तर अन्य एका खांबाचा व्यास चार मीटर इतका मोठा आहे. हा नदीपूल वापी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. दोन स्थानकांदरम्यान औरंगा आणि पार नदी अशा दोन नद्या आहेत. कोलक नदी वालवेरीजवळील सापुतारा डोंगरातून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोलक नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून 7 किमी अंतरावर आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकापासून 43 कि.मी. अंतरावर आहे. 350 मीटर लांबीचा आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला बोगदा गुजरातमधील वलसाड येथील झारोली गावाजवळ पूर्ण झाला असून तो डोंगरातून जातो.

महाराष्ट्रातील कामे सुरु

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची चार स्थानके आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे महाराष्ट्रातील सुरुवातीचे स्थानक बीकेसी येथे आहे. या अंडरग्राऊंड स्थानकासाठी मोठा खड्डा खणण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात आता टीबीएम मशिन टाकण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी बोगदा खणण्याचे काम सुरु होणार आहे. बीकेसी आणि शिळफाटा येथील या बोगदा 21 किमी बोगद्याचे काम सुरु असून या बोगद्याचा 7 किमी भाग ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे. त्यामुळे हा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. ठाणे, विरार आणि बोयसर स्थानकाची कामे सुरु आहेत. या उन्नत मार्गासाठी खांब उभारण्यासाठी 100 हून अधिक फाऊंडेशनची कामे अलिकडेच पूर्ण झाली आहेत. तर पालघर जिल्ह्यात डोंगरात पाच बोगदे खणण्याचे काम सुरु झाले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.