AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुंड्याचे फायदे काय? नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पुस्तक, राष्ट्रीय महिला आयोगाचे शिक्षण मंत्र्यांना कारवाईचे आदेश

राष्ट्रीय महिला आयोगाने मंगळवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे. टी के इंद्राणी यांचे 'टेक्स्टबुक ऑफ सोशियोलॉजी फॉर नर्सेस' हे पुस्तक नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आहे.

हुंड्याचे फायदे काय? नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पुस्तक, राष्ट्रीय महिला आयोगाचे शिक्षण मंत्र्यांना कारवाईचे आदेश
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्माImage Credit source: PTI
| Updated on: Apr 06, 2022 | 9:28 AM
Share

नवी दिल्ली : हुंडा पद्धतीच्या (Dowry) फायद्यांची यादी देणारे पुस्तक नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) मंगळवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कारवाई करण्यास सांगितले. टी के इंद्राणी लिखित ‘टेक्स्टबुक ऑफ सोशियोलॉजी फॉर नर्सेस’ या पुस्तकावरुन वादाचा धुरळा उडाला आहे. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या (Nursing Council)  अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिल्याचा उल्लेख मुखपृष्ठावर केलेला आहे. हुंड्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेचा वाटा मिळणे हा प्रतिगामी प्रथेतील एक फायदा आहे, असं हुंड्याचे नफे या शीर्षकाखाली लिहिण्यात आलं आहे.

हुंडा पद्धतीच्या फायद्यांची यादी

भारतात हुंडाप्रतिबंधक कायदा अस्तित्वात येऊन अनेक वर्ष उलटल्यानंतरही देशाच्या विविध भागात, उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ अशा विविध स्तरीय समाजात हुंड्याची देवाण-घेवाण सुरुच असल्याच्या तक्रारी अनेकदा पाहायला मिळतात. त्यातच हुंडा पद्धतीच्या फायद्यांची यादी देणारे पुस्तक नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

टी के इंद्राणींचे पुस्तक

राष्ट्रीय महिला आयोगाने मंगळवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे. टी के इंद्राणी यांचे ‘टेक्स्टबुक ऑफ सोशियोलॉजी फॉर नर्सेस’ हे पुस्तक नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आहे. हुंड्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेचा वाटा मिळणे हा या प्रतिगामी प्रथेतील एक फायदा आहे, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिल्याचा उल्लेख मुखपृष्ठावर केलेला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने काय म्हटलंय?

राष्ट्रीय महिला आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ही बाब गंभीर चिंतेची असून आयोगाने त्याची दखल घेतली आहे.’हुंड्या’सारख्या प्रचलित चालीरितीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चुकीचा संदेश दिला जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे” असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रेखा शर्मा यांनी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनाही पत्र लिहून या प्रकरणी कारवाई सुरु करत राष्ट्रीय महिला आयोगाला आठवड्याभरात माहिती देण्यास सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

भुसावळमध्ये लग्नाआधीच मुलीचा हुंड्यासाठी छळ, लग्न मोडण्याची धमकी; अखेर तरुणीने उचलले हे टोकाचे पाऊल

सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल संचालकावर गुन्हा, बायकोकडे 25 लाखांचा तगादा?

पुण्यात हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून परिचारिकेने उचलेले टोकाचे पाऊल

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.