आता पेट्रोल-डिझेलमुळे तुमचा खिसा रिकामा होणार नाही, गायीच्या शेणापासून मिळणार स्वस्त इंधन!

आता पेट्रोल-डिझेलमुळे तुमचा खिसा रिकामा होणार नाही, गायीच्या शेणापासून मिळणार स्वस्त इंधन!
गाय

भारतातील नॅशनल काऊ कमीशनने एक उपयुक्त सल्ला देऊ केलाय. गायीच्या शेणापासून बनलेल्या नॅच्युरल गॅस CNGचा उपयोग करण्याचा उपाय सुचवला आहे.

सागर जोशी

|

Feb 22, 2021 | 10:39 PM

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिरा रिकामा होतोय. वाढत्या इंधन दरांमुळे महिलांचं बजेटही कोलमडलं आहे. अशा स्थितीत भारतातील नॅशनल काऊ कमीशनने एक उपयुक्त सल्ला देऊ केलाय. गायीच्या शेणापासून बनलेल्या नॅच्युरल गॅस CNGचा उपयोग करण्याचा उपाय सुचवला आहे. गायीच्या शेणापासून बनणारा गॅस ही स्वस्त आणि मेड इन इंडिया आहे. आयोगानं हा सल्ला 25 फेब्रुवारीला होणाऱ्या काऊ सायन्स एक्झामसाठी आपल्या वेबसाईटवर उपलोड केला आहे. राष्ट्रीय कामधेनु आयोग (RKA)ने गायींपासून विविध उद्योगांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.(National Kamadhenu Commission considers using biogas as CNG for vehicles)

नॅशनल काऊ कमिशनचं म्हणण आहे की, आयोगाच्या अनेक वेबिनारमध्ये गायीशी निगडीत उद्योगांबाबत चर्चा झाली. जगभरातील उद्योजकांच्या नव्या-जुन्या कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन या शक्यतांवर काम सुरु केल्याचं RKA ने आपल्या वेबसाईटवर म्हटलं आहे. RKAच्या म्हणण्यानुसार बायोगॅसचा वापर इंधनाच्या रुपाने अनेक वर्षांपासून केला जातो. हा गॅस सिलिंडरमध्ये भरला जातो आणि स्वयपाक बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. शेणापासून निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग गाड्यांमध्येही केला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणात बायोगॅसची निर्मिती करुन कुणी सीएनजी पंप उभा केला तर परिवहन उद्योगासाठी भारतात बनलेलं स्वस्त इंधन उपलब्ध होऊ शकतं.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय

ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढत आहेत. अशात काल दरांमध्ये थोडीफार स्थिरता पाहायला मिळाल्यानंतर आता पुन्हा दरांमध्ये 30 पैशांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर रविवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. तरीही पेट्रोल डिझेलचे दर ऑल टाईम हायवर होते.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.58 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 97.00 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.78 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.59 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 88.92 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.97 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.06 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.56 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.98 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Diesel Price Today): 81.41 रुपये प्रति लिटर

संबंधित बातम्या :

Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

…म्हणून पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचलं; पेट्रोलियम मंत्र्यांनीच सांगितलं ‘कारण’

National Kamadhenu Commission considers using biogas as CNG for vehicles

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें