Navneet Rana: तुम्ही कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार हे 14 तारखेच्या सभेतून जाहीर करा; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान

Navneet Rana: राजद्रोहाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. पण ब्रिटीश रुलनुसार उद्धव ठाकरे राज्य चालवण्याचं काम करत आहेत.

Navneet Rana: तुम्ही कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार हे 14 तारखेच्या सभेतून जाहीर करा; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान
नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 4:07 PM

नवी दिल्ली: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना ललकारले आहे. ज्यांनी विचार सोडले त्यांची येत्या 14 मे रोजी सभा आहे. त्यांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवण्यासाठी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत, असं सांगतानाच हिंमत असेल तर 14 तारखेच्या सभेत तुम्ही कुठून लढणार त्या मतदारसंघाची घोषणा करा. मी तुमच्या विरुद्ध लढण्यास तयार आहे, असं आव्हानच नवनीत राणा यांनी दिलं. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांना सत्तेचा मोह नव्हता. त्यांनी कधी निवडणूक लढली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा दिल्लीत आहेत. दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची त्यांनी कालच भेट घेऊन त्यांच्यावर झालेला अन्याय कथन केला. त्यानंतर आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं. यावेळी त्यांनी आपण कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं नसल्याचंही स्पष्ट केलं.

ज्यांनी विचार सोडले त्यांची 14 मे रोजी सभा होत आहेत. त्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला सोडवण्यासाठी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत. सकाळी 9 वाजता ही महाआरती करण्यात येईल, असं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

कारण नसताना मला पकडलं

राजद्रोहाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. पण ब्रिटीश रुलनुसार उद्धव ठाकरे राज्य चालवण्याचं काम करत आहेत. हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं आहे. मला कारण नसताना पकडलं गेलं. विनाकारण मला त्रास दिला गेला, असं त्या म्हणाल्या.

तेव्हा मी कस्टडीत नव्हते

लिलावती रुग्णालय हे रुग्णालय आहे. माझे उपचार घेतानाचे फोटो व्हायरल झाले. तेव्हा मी काही कस्टडीत नव्हते. मी जर कस्टडीत असताना माझे फोटो व्हायरल झाले असते तर माझ्यावर कारवाई व्हायला हवी होती. ज्या स्वत: कंपाऊंडर आहेत. त्या लिलावतीत जाऊन डॉक्टरांना प्रश्न विचारत होत्या, असा टोला त्यांनी लगावला.

घर तोडले तरी लढाई सुरूच राहील

सात वर्षानंतर पालिकेने आमच्या घराला नोटीस बजावली आहे. त्याला आम्ही उत्तर देणार आहोत. माझे घर तोडले तरी सरकार विरोधातील आमची लढाई सुरूच राहील. आमची लढाई ही भ्रष्टाचाराविरोधातील आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.