AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nehru Memorial : काँग्रेसमुक्तीसाठी आणखी एक निर्णय, नेहरु मेमोरीयलचं नव्यानं बारसं, आंबेडकर जयंतीला उद्घाटन

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे तत्कालीन निवासस्थान आणि आता नेहरू संग्रहालयामुळे प्रसिद्ध अशा तीन मूर्ती भवन परिसरात नवं 'पंतप्रधान संग्रहालया'ची निर्मिती करण्यात आलीय.

Nehru Memorial : काँग्रेसमुक्तीसाठी आणखी एक निर्णय, नेहरु मेमोरीयलचं नव्यानं बारसं, आंबेडकर जयंतीला उद्घाटन
जवाहरलाल नेहरु, नरेंद्र मोदीImage Credit source: TV9
| Updated on: Mar 30, 2022 | 7:16 PM
Share

नवी दिल्ली : ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. त्यादृष्टीने भाजप कामाला लागली आणि त्याचे परिणाम नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह (State Assembly Elections) आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले. काँग्रेसमुक्तीसाठी भाजपनं अजून एक निर्णय घेतलाय. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचे तत्कालीन निवासस्थान आणि आता नेहरू संग्रहालयामुळे प्रसिद्ध अशा तीन मूर्ती भवन परिसरात नवं ‘पंतप्रधान संग्रहालया’ची (Prime Minister Museum) निर्मिती करण्यात आलीय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान संग्रहालयाला आवर्जून भेट देण्याची सूचनाही केली. सर्व माजी पंतप्रधानांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आतापर्यंत भाजपचा केवळ एकच पंतप्रधान झाला. बाकी तर त्यांचेच होते. माजी पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांचा आदर करायला हवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना सांगितलं. या बैठकीला भाजप खासदारांसह भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

कसं आहे नवं ‘पंतप्रधान संग्रहालय’?

नव्या पंतप्रधान संग्रहालयात दुर्मीळ फोटो, भाषणं, व्हिडीओ क्लिप, वृत्तपक्षांची कात्रणं, मुलाखती, माजी पंतप्रधानांचे आणि त्यांच्यावरील मूळ लेखन असा ठेवा आहे. यात माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांकडून गोळा करण्यात आलेल्या त्यांच्या खासगी वस्तूंचाही समावेश आहे. यात अनेक छायाचित्र, पत्र व्यवहार, पेन, आदी वस्तू आहेत.

या प्रकल्पाला 2018 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी 270 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. हा प्रकल्प 2020 मध्ये तयार होणं अपेक्षित होतं. मात्र, कोरोनामुळे संग्रहालयाचं बांधकाम रखडलं होतं.

PM Memorial

पंतप्रधान संग्रहालयाची वास्तू

नेहरुंचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

दरम्यान, तीन मूर्ती भवन परिसर आणि नेहरू संग्रहालयाचं स्वरुप बदलण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तसंच या प्रकल्पाही काँग्रेसचा विरोध आहे. नव्या पंतप्रधान संग्रहालयामुळे नेहरू संग्रहालयाचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आलाय.

इतर बातम्या : 

Karnataka Halal Meat Row: ‘हलाल’ मटण म्हणजे ‘आर्थिक जिहाद’च, भाजप नेत्याचं वक्तव्य, हिजाबनंतर कर्नाटकात आता नवा वाद

navneet rana on privilege motion: नवनीत राणांचा संसदेत हक्कभंग, मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.