Bihar | नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला? सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरु

जनता दल यूनाइटेडचे नेते नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November

Bihar | नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला? सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरु
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 1:51 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्यात एनडीएनं यश मिळवलं आहे. एनडीएनं 243 जागांपैकी 125 जागांवर तर महाआघाडीनं 110 जागांवर विजय मिळवला. जनता दल यूनाइटेडचे नेते नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत, मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा शपथविधी 16 नोव्हेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेतली. (Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November )

भाजप आणि जेडीयूचे नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्याविषयी चर्चा सुरु असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. दोन्ही पक्षांचे नेते लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील.

नितीश कुमारचं मुख्यमंत्री

बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी भाजपनं 74, जेडीयूनं 43 आणि इतर मित्रपक्ष मिळून 125 जागांवर विजय मिळवला आहे. एनडीएमध्ये सर्वाधिक जागा भाजपनं मिळवल्या आहेत. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होणार असल्याचे भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होतील हे स्पष्ट केले. एनडीएमधील भाजप, जेडीयू हिंदुस्तान आवाम मोर्चा, विकासशील इन्सान पार्टी यांच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. मात्र, त्याबद्दल निर्णय झालेला नाही,अशी सूत्रांची माहिती आहे.

श्रीकृष्ण सिंह यांचा विक्रम मोडण्याची संधी

श्रीकृष्ण सिंह यांच्या नावावर बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आहे. श्रीकृष्ण सिंह 1946 ते 1961 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना आधुनिक बिहारचा शिल्पकार असं बोललं जातं. श्रीकृष्ण सिंह हे 17 वर्षे 52 दिवस मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.

नितीश कुमार यांच्याकडे सर्वाधिक काळ मु्ख्यमंत्रीपदावर राहण्याची संधी आहे. नितीश कुमार यांनी आतापर्यंत 14 वर्षे 82 दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. तर माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे 7 वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. बिहारने आतापर्यंत 5 दिवसांपासून ते 14 वर्षापर्यंतचे मुख्यमंत्री पाहिले आहेत.

नितीश कुमार यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, एका वर्षाच्या आतचं ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि काँग्रेससोबत आघाडी केली. यानिवडणुकीत विजय झाल्यानंतर नितीशकुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. मात्र, 2017 मध्ये नितीश कुमार यांनी राजीनामा देत पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपसोबत  सत्ता स्थापन करत नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले.

संबंधित बातम्या :

‘जदयू’ची 15 वर्षातील सर्वात खराब कामगिरी; मुख्यमंत्रिपदावरुन नितीश कुमारांचे मन उडाले, भाजपकडून मनधरणी

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच ‘त्यांचं’ डिपॉझिट जप्त; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात

(Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November )

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.