मोदी सरकारचा दुसरा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं, तुमच्या जिल्ह्यातील दर किती?

पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर महाराष्ट्रात पेट्रोल 80 रुपयांच्या जवळ पोहोचलं आहे. परभणीत सर्वाधिक पेट्रोल दर 80.41 रुपये इतका आहे. 

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:21 AM, 6 Jul 2019
मोदी सरकारचा दुसरा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं, तुमच्या जिल्ह्यातील दर किती?

Petrol and diesel prices मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलवर दोन रुपये एक्साईज ड्युटी आणि अतिरिक्त सेस वाढवला. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेल महागलं आहे. हा अतिरिक्त कर लावल्यानंतर पेट्रोल 2.50 रुपये आणि डिझेल 2.30 रुपये प्रति लीटरने महागलं आहे. आजपासून वाहनधारकांना याचा फटका बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल लोकसभेमध्ये मोदी सरकार 2.0 चा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला.

या बजेटमध्ये सोने, पेट्रोल-डिझेल यावरील अधिभार वाढवल्याने सर्व काही महागणार आहे.  त्यानुसार इंधनाच्या मूळ किमतीवर केंद्राची एक्साईज ड्युटी आणि सेस लागल्यानंतर VAT लागतो. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर 2 रुपये 50 पैसे वाढ झाली आहे. मोदी सरकारचा हा बजेटनंतरचा दुसरा झटका आहे. यापूर्वी काल बजेट जाहीर झाल्यानंतर सोने दरात दोन तासात 1400 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलही महागलं आहे.

दरम्यान, पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर महाराष्ट्रात पेट्रोल 80 रुपयांच्या जवळ पोहोचलं आहे. परभणीत सर्वाधिक पेट्रोल दर 80.41 रुपये इतका आहे.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर – स्त्रोत IOCL

                    पेट्रोल              डिझेल

मुंबई –         78.57               69.90

पुणे –          78.34                68.59

ठाणे –         78.69                70.02

नागपूर –     79.07                70.45

औरंगाबाद   79.56                 70.90

नाशिक        78.95               69.17

कोल्हापूर     78.75               69.01

सोलापूर       79.57              70.47

परभणी      80.41               70.58

 

पालघर      78.53              68.74

वर्धा        78.87                 69.13

भंडारा    78.06                  69.13

गोंदिया  79.78                  70.00

चंद्रपूर – 78.61                 68.89

गडचिरोली – 79.13           69.39

अकोला    – 78.56            68.83

अमरावती  79.77                71.13

बुलढाणा   79.76                69.95

यवतमाळ  79.61

वाशिम-  79.61

संबंधित बातम्या 

बजेटपूर्वी सोने दर 34 हजार 300, दोन तासात सोने दरात 1400 रुपये वाढ

अर्थसंकल्पामुळे तुमच्या आयुष्यात या 10 गोष्टी बदलणार  

Budget 2019: अर्थसंकल्पात कुणाला किती कर सवलत?

घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, अर्थसंकल्पात काय महाग, काय स्वस्त?