AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 Years of PM Modi : पाकिस्तानला डायरेक्ट भिडणं ते रशिया युक्रेन युद्धाच्यावेळची घेतलेली भूमिका मोदींच्या ‘या’ गोष्टी कायम राहणार आठवणीत!

Modi Government 9 Years : मोदींनी जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. प्रत्येक देश भारतासोबत चांगलं संबध ठेवायचा प्रयत्न करत आहे.

9 Years of PM Modi : पाकिस्तानला डायरेक्ट भिडणं ते रशिया युक्रेन युद्धाच्यावेळची घेतलेली भूमिका मोदींच्या 'या' गोष्टी कायम राहणार आठवणीत!
| Updated on: Jun 01, 2023 | 6:02 PM
Share

नवी दिल्ली : 2014 साली केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला 26 मे ला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2014 मध्ये सत्तांतर झालं होतं त्यानंतर मोदी सरकारने केलेल्या कामांनंतर 2019 ची निवडणूक लढवली होती. त्यामध्येही मोदी सरकारला यश आलं होतं कारण भाजपने पुन्हा एकदा केंद्रात आपली सत्ता कायम ठेवली होती.

मोदींनी जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. प्रत्येक देश भारतासोबत चांगलं संबध ठेवायचा प्रयत्न करत आहे. भारताने कोविड काळात अनेक देशांना मदत केली होती. नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनीसुद्धा मोदींचं कौतुक केलं होतं. भारताचं परराष्ट्र धोरण वेगवान झालं आहे. पीएम मोदींनी इतर नेत्यांसोबत ठेवलेल्या संबधांमुळे हे स्थान त्यांनी मिळवलं असल्याचं अमिताभ कांत म्हणाले होते.

पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक

भारताचे माजी राजदूत किशन एस. राणा यांनी सांगितले की ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी त्यांच्या शपथविधी समारंभात दक्षिण आशियाई शेजारी आणि मॉरिशसच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. नरेंद्र मोदींच्या मास्टरस्ट्रोकची ही सुरुवात असल्याचे ते म्हणाले होते.

भारत ज्या प्रकारे चीनसमोर खंबीरपणे उभा आहे. यापूर्वी इतर कोणत्याही देशाला असा सामना करता आला नसल्याचं कंवल सिब्बल यांनी म्हटलं होतं.

मोदी जगात लोकप्रिय बनले

आज जगातील जवळपास सर्व लहान-मोठ्या देशांचे नेते भारताचे आणि पंतप्रधानांचे कौतुक करण्यासाठी येथे येतात. अलीकडेच अमेरिकेच्या मंत्री जीना रायमंडो यांनी पंतप्रधान मोदींना जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून संबोधले होते.

मोदींचा इस्रायल दौरा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पीएम मोदींना सांगितले होते की, तुम्ही क्रांतिकारी नेते आहात. ते म्हणाले होते की, आमच्या 3000 वर्षांच्या इतिहासात तुमच्यापूर्वी एकही भारतीय नेता इस्रायलमध्ये आला नव्हता.

एप्रिलपर्यंत 67 परदेश दौरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत त्यांनी 67 परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचा समावेश आहे. तथापि, पंतप्रधानांसह परराष्ट्र धोरणाचे इतर महत्त्वाचे स्तंभ आहेत. यामध्ये सुषमा स्वराज, जनरल व्हीके सिंग, अजित डोवाल आणि विद्यमान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा समावेश आहे.

युनायटेड स्टेट्सशी मजबूत संबंध

भारताचे अमेरिकेशी संबंध दृढ झाले आहेत. आज अमेरिका भारताला रशियाशी असलेल्या जवळीकीच्या दृष्टीने पाहत नाही आणि भारत अमेरिकेला पाकिस्तानशी असलेल्या संबंधांच्या दृष्टीने पाहत नाही. या कारणास्तव, गैर-नाटो देशांबद्दल बोलायचे तर, भारत आणि अमेरिकेत सर्वोत्तम लष्करी आणि सामरिक संबंध आहेत. माजी मुत्सद्दी कंवल सिब्बल म्हणाले की, अमेरिका आमचा सर्वात मोठा आर्थिक भागीदार म्हणून आमच्यासमोर आहे.

भारत कुणालाही उत्तरदायी नाही

युक्रेन युद्धावर आपले मत मुक्तपणे ठेवून भारताने आपले परराष्ट्र धोरण कोणत्याही दबावाखाली नसल्याचे सांगितले आहे. यामुळेच अमेरिका आणि रशियाशी भारताच्या संबंधांवर कोणताही परिणाम झाला नाही.

पाकिस्तानला प्रत्युत्तर

भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानबाबत नरेंद्र मोदी अतिशय कठोर वाटतात. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाचा मार्ग सोडत नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचबरोबर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारत दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यास फार वेळ घेणार नाही, असा कडक इशारा उघडपणे पाकिस्तानला दिला होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.