AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : पंडित नेहरूंच्या त्या पत्राचा उल्लेख, पंतप्रधान मोदी म्हणाले काँग्रेसने केले हे पाप

PM Narendra Modi attack on Former PM Nehru : लोकसभेत आज हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या मुद्दावरून वातावरण चांगलेच तापले. संसदेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने संसदेत एकच गोंधळ उडाला. दुपारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी तर संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केले.

PM Narendra Modi : पंडित नेहरूंच्या त्या पत्राचा उल्लेख, पंतप्रधान मोदी म्हणाले काँग्रेसने केले हे पाप
नरेंद्र मोदी, पंडित जवाहरलाल नेहरू
| Updated on: Dec 14, 2024 | 7:03 PM
Share

लोकसभेत हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या मुद्दावरून प्रचंड गदारोळ उभ्या भारताने पाहीला. दुपारच्या सत्रात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर आरोपांची राळ उडवली. त्यांनी पुन्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर शा‍ब्दिक हल्ले चढवले. त्यांनी संविधानाचा गळा घोटण्याचे काम केले. काँग्रेस कायम संविधानविरोधी राहिल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यांनी पंडित नेहरूंच्या त्या पत्राचा उल्लेख करताच संसदेत एकच गोंधळ झाला.

एकाच कुटुंबाचे ५५ वर्ष राज्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तिखट हल्ला केला. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. मी एका कुटुंबाचा हा उल्लेख यासाठी करतो की ७५ वर्षापैकी एकाच कुटुंबाने ५५ वर्ष राज्य केलं. त्यामुळे देशाला काय काय झालं हे माहीत करून घेण्याचा अधिकार आहे. आणि या कुटुंबाचे कुविचार, कुनिती, कुरिती याची परंपरा निरंतर सुरू आहे. प्रत्येक स्तरावर या कुटुंबाने संविधानाला आव्हान दिलं आहे. या देशात १९४७ ते १९५२ या देशात निवडून आलेलं सरकार नव्हतं. एक अस्थायी व्यवस्था होती. एक सिलेक्टेड सरकार होती. निवडणूक झाली नव्हती. तोपर्यंत अंतरिम व्यवस्था म्हणून त्यांना सत्ता मिळाली. १९५२ पूर्वी राज्यसभा स्थापन झाली नव्हती. राज्यात सरकार नव्हते. संविधानही तयार झालं होतं. १९५१ मध्ये निवडून आलेलं सरकार नव्हतं तेव्हा अध्यादेश काढून त्यांनी संविधान बदलला. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला चढवला. आणि हा संविधान निर्मात्यांचा अपमान होता, असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर केला.

काय होतं ते पत्र

यावेळी पंतप्रधानांनी पंडित नेहरू यांच्या एका पत्राचा उल्लेख केला. त्यांनी पंडित नेहरू यांच्या कारभारावर टीका केली. त्यांनी संधी मिळताच त्यांनी अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर हातोडा मारला. हा संविधान निर्मात्यांचा अपमान केला असे ते म्हणाले. त्यावेळचे पंतप्रधान नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, जर संविधान आपल्या रस्त्यात आड आलं तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल केला पाहिजे. हे नेहरूंनी म्हटलं होतं.

१९५१मध्ये हे पाप केलं गेलं. पण देश मौन नव्हतं. तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी इशारा दिला होता. हे चुकीचं होत आहे. लोकसभा अध्यक्षांनीही सांगितलं हे चुकीचं होतं. आचार्य कृपलानी आणि जयप्रकाश नारायण यांनीही त्यांना सांगितलं हे बंद करा. पण नेहरूंचं स्वतचं संविधान सुरू होतं. त्यांनी वरिष्ठांचं ऐकलं नाही. त्यांनी दुर्लक्ष केलं. हे संविधान दुरुस्ती करण्याचं रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागलं. त्यांनी वेळोवेळी संविधानात बदल केला. शिकार केला. संविधानाला रक्तबंबाळ केला. सहा दशकात ७५ वेळा संविधान बदललं, असा दावा पंतप्रधानांनी केला.

जे पाप देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी केलं. त्याला खाद्य पाणी पुरवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. जे पाप नेहरूंनी केलं. तेच इंदिरा गांधींनी केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधान बदलून बदलला गेला. १९७१ मध्ये संविधान दुरुस्ती केली गेली. त्यांनी देशातील न्यायालयाचे पंख कापले होते. संसद संविधानाच्या कोणत्याही आर्टिकलमध्ये जे मनात वाटेल ते करू शकते. कोर्ट त्याकडे पाहू शकत नाही. कोर्टाच्या अधिकारावर गदा आणली. हे पाप इंदिरा गांधींनी केलं होतं, असा आरोप त्यांनी केला.

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.