Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘5 दशकं गरिबी हटावचे नारे ऐकले पण आता…’, पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबीबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार असं मोदी यांनी म्हटलं आहे.

'5 दशकं गरिबी हटावचे नारे ऐकले पण आता...', पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा
Follow us
| Updated on: Feb 04, 2025 | 6:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार, काही नेते गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करतात, पाच दशकं देश गरिबी हटावचा नाराच ऐकत होता’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी?

काही नेते गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करतात, फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार. देशानं पाच दशक गरिबी हटावचे नारे ऐकले. दिल्लीतून एक रुपया निघायचा तर 15 पैसे गरिबांना मिळायचे. मात्र आम्ही खोट्या घोषणा न देता खरा विकास केला. बचत आणि त्यातून विकास हे आमच्या सरकारचं मॉडेल आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये 25 कोटी जनता गरिबीमधून बाहेर आली, असा दावा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही खोट्या घोषणा न देता खरा विकास केला आहे. तीन लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवले, दहा कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं आम्ही हटवली.  बचत आणि विकास हेच आमच्या सरकारचं मॉडेल आहे. पूर्वी दिल्लीतून एक रुपया निघाला की गरिबांच्या हातात केवळ 15 पैसे पडायचे, पण आता गरिबांच्या खात्यात थेट पैसा जमा होत आहे. प्रत्येक घरात नळानं पाणी पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मोदींनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं. जास्त ताप आल्यावर लोक काहीही बोलतात, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर केला आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली, आता या टीकेला काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.