लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार, जगतगुरु रामभद्राचार्य यांची भविष्यवाणी

Rambhadracharya Prediction On BJP : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार, जगतगुरु रामभद्राचार्य यांची भविष्यवाणी
जगद्गुरु रामभद्राचार्य
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 10:41 AM

नवी दिल्ली | दि. 9 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका आता आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने आपली पहिली यादीही जाहीर केली आहे. या निवडणुकीसंदर्भात काही संस्थांचे ओपिनियम पोल आले आहेत. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

काय म्हणाले जगद्गुरु रामभद्राचार्य

जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर शुक्रवार रामभद्राचार्य मैहर वाली शारदा देवीच्या मंदिरात पोहचले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भाजप 370 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा कोणताही परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार नाही?, असे त्यांनी म्हटले. 3 नोव्हेंबर 2023 रोजी जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे भविष्य वर्तवले होते.

हे सुद्धा वाचा

राम मंदिर पूर्ण झाल्याचा आनंद

जगद्गुरु रामभद्राचार्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सनातन धर्माला विरोध करणारे लोक राम मंदिर झाल्याबद्दल दु:खी आहे. राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान होणे, हे कोट्यवधी भाविकांचे स्पप्न होते. यामुळे सर्वच भारतीय आनंदीत झाले आहे.

कोण आहेत रामभ्रदाचार्य

रामभद्राचार्य यांचा जन्म 1950 मध्ये जौनपूर येथील खांदीखुर्द गावात झाला. चित्रकूटमध्ये राहणारे रामभद्राचार्य प्रख्यात विद्वान, रचनाकार, प्रवचनकार आहेत. रामानन्द सम्प्रदायामधील सध्याच्या चार जगद्‌गुरुपैंकी एक ते आहे. 1988 पासून ते या पदावर आहे. ते चित्रकूटमध्ये असणाऱ्या संत तुलसीदास सामाजिक सेवा संस्थानचे संस्थापक आणि अध्यक्ष आहे.

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात 195 उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत.

हे ही वाचा

दिल्लीत मध्यरात्रीपर्यंत खल, महायुतीचे जागा वाटप करुन पवार, शिंदे परतले, कोणाला किती मिळाल्या जागा

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.