अक्षरधाम मंदिरात साजरा झाला स्वातंत्र्य दिन,संतानी दिली राष्ट्रध्वजाला सलामी
दिल्लीतील भव्य अक्षरधाम मंदिरात आज सकाळी स्वातंत्र्य दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहाने देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला.या वेळी सद्गुरु ईश्वर चरण स्वामी जी यांची प्रमुख उपस्थिती महत्वाची ठरुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सण साजरा झाला.

दिल्ली येथील भव्य अक्षरधाम मंदिरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. यावेळी सद्गुरु ईश्वर चरण स्वामी जी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ साजरा झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभु वंदना आणि राष्ट्रध्वजाच्या पूजनाने झाली. BAPS संस्थेच्या (अक्षरधाम संस्थान) आंतरराष्ट्रीय संयोजक सद्गुरु पूज्य ईश्वरचरण स्वामी जी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून सलामी देण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित राष्ट्रगीतात सामील झाले. यावेळी देशभक्ती गीत आणि प्रेरणादायी वक्तव्यांनी वातावरणात देशप्रेम ओतप्रोत भरले होते.
राजधानी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरातही आज ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी साधु संताच्या उपस्थित झेंडावंदन करण्यात आले. आजच्या विशेष स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये सुरक्षा विभागातील स्वयंसेवक आणि परिसरातील ड्यूटीवर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी देखीस सहभाग घेतला. सर्वांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या विशेष सोहळ्या निमित्त सद् गुरु ईश्वरचरण स्वामी जी यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज आपण देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आजच्या दिवशी आपण इश्वराला प्रार्थना करुयात की भारताचा प्रत्येक क्षेत्रात पूर्ण विकास होवो. वर्तमान काळात देशात ज्या समस्या आहेत. त्यांचे वेगाने निराकरण होवो. सर्व भारतवासी सुखी होवो. आजच्या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांच्या स्मृतींना आपण उजाळा देतो. आजच्या दिवशी आपण गुरु योगीजी महाराज यांना कसे विसरु शकतो. ते त्यांचे गुरु शास्रीजी महाराज यांच्या आज्ञेने भारताच्या स्वातंत्र्यासाठी रोज २५ माळांचा जप करायचे. त्यांची ही भक्ती आणि तपश्चर्या भारताच्या स्वातंत्र्याचे मूळ आहे.अशा प्रकारे अनेक लोकांच्या पुरुषार्थाने मिळालेल्या या स्वातंत्र्याचे आपण यत्नपूर्वक रक्षण करुया अशी बुद्धी आणि शक्ती सर्वांना प्राप्त हो हीच प्रार्थना!’
८८ वर्षांच्या वयातही स्वामीजीनी देशाची सेवा आणि सन्मानचा हा सण हृदयापासून साजरा करीत सर्वांना देशाची सेवा, नैतिक मुल्यांचे पालन आणि सामाजिक सद् भावाला वाढवण्याचा संदेश दिला आहे. या शुभ घडीला अक्षरधाम परिसरात बालके, तरुण आणि महिला तसेच सर्व पाहुणे श्रद्धाळूंनी तिरंग्याच्या सन्मान सोहळ्यात भाग घेतला आणि भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाविषय अभिमान व्यक्त केला. शेवटी प्रार्थना आणि शांतीच्या संदेशासह हा समारंभ साजरा झाला.
