मोठी बातमी! महाराष्ट्रात वाद राजस्थानमध्ये हादरा, शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला थेट अल्टिमेटम
मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आता मोठी मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे भाजपाचं टेन्शन वाढणार आहे.

बिहारमध्ये एनडीएल प्रचंड बहुमत मिळालं आहे, पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएची सत्ता आली आहे. मात्र आता राजस्थानमध्ये शिवसेना शिंदे गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राजस्थानमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला थेट इशारा देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपने जर आमच्यासोबत युती केली तर आम्हाला काही जागा द्याव्या लागतील, अन्यथा आम्ही राज्यात सर्वच ठिकाणी आमचे उमेदवार उभे करू अशी भूमिका आता शिवसेना शिंदे गटाकडून घेण्यात आली आहे, त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये गेल्या वर्षी शिवसेना शिंदे गटामध्ये तीन आमदारांनी प्रवेश केला होता, त्यामुळे राजस्थानात आता शिवसेना शिंदे गटाची सक्रियता वाढली आहे. त्यानंतर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला आहे, तसा अल्टिमेटमच पक्षाकडून भाजपला देण्यात आला आहे, युती झाल्यास काही जागा आम्हाला द्याव्या लागतील, अन्यथा आम्ही राज्यातील सर्व जागांवर आमचे उमेदवार उभारू असं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद सिंह यांनी म्हटलं आहे की, एक राजकीय पक्ष असल्यामुळे आम्हाला निवडणूक लढवावीच लागणार आहे, आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्यावं
एक राजकीय पक्ष असल्यानं आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत, त्यामुळे जर आमची भाजपसोबत युती झाली तर आम्हाला आपच्या मित्र पक्षाने या निवडणुकीत योग्य प्रतिनिधत्व द्यावं, जर योग्य प्रतिनिधित्व भेटलं नाही तर आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढू असं यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकीकडे महायुतीमध्ये महाराष्ट्रात धुसफूस सुरू असताना, नाराजीनाट्य सुरू असताना आता दुसरीकडे मात्र राजस्थानमध्ये शिवसेना शिंदे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून येत आहे.
