Gyanvapi Masjid | ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलिंग मिळालं : हिंदू पक्ष-TV9

| Updated on: May 16, 2022 | 4:29 PM

ज्ञानवापी मशिदीच्या विहीरीत शिवलिंग मिळालं असा दावा हिंदू पक्षानी केला आहे. तर, मशिदीत कोणतंही शिवलिगं नाही असा मुस्लिम पक्षाचा दावा.

Follow us on

वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामध्ये (Gyanvapi masjid survey) तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडले आहे. त्यानंतर कोर्टाने जिथे शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने (Court) एका याचिकाकर्त्याच्या अर्जानंतर हे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस आहे. सर्वेक्षणाच्या नंतर हिंदू पक्षकारांच्या बाजूने असलेले डॉ. सोहनलाल यांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले की, आतमध्ये शिवलिंग (Shivling) सापडले आहे. तर, मशिदी.त कोणतंही शिवलिंग नाही असा दावा मुस्लिम पक्षाचा आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. या सर्वेक्षणाचा नेमका निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.