Karnataka Corona | धोक्याची घंटा ? दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोना

दक्षिण आफ्रकेतून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळे आहेत. त्यांची चाचणी केली असता हे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांना ज्या कोरोना विषाणूची बाधा झालीय तो नेमका कोणता आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या दोन कोरोना रुग्णांमुळे कर्नाटक राज्यात आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आलीय.

Karnataka Corona | धोक्याची घंटा ? दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोना
Omicron Variant

बंगळुरु : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन नावाचा नवा कोरोना विषाणू आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या या नव्या रुपामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा तसेच केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रकेतून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळे आहेत. त्यांची चाचणी केली असता हे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांना कोणत्या विषाणूची बाधा झाली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. या रुग्णांवर आता उपचार करण्यात येत असून कर्नाटक राज्यात आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आले 94 प्रवाशी  

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 2 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बंगळुरू विमानतळावर हे प्रवाशी उतरले होते. चाचणी केल्यांनतर या दोन्ही प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत बंगळुरूमध्ये 594 प्रवाशी परदेशातून दाखल झाले आहेत. यातील 94 प्रवाशी हे एकट्या दक्षिण आफ्रिकेतील आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्णांना सध्या क्वॉरन्टाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत.

पंतप्रधानांनी घेतली महत्त्वाची बैठक, खबरदारी घेण्याची सूचना

या नव्या व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोणती काळजी घ्यावी, काय खबरदारी घेण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाली. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवावे, असे सूचित करण्यात आले आहे.

नव्या व्हेरिएंटबद्दल आतापर्यंत काय माहिती आहे?

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराला शास्त्रीय भाषेत B.1.1529 या नावाने ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word). WHO ने सांगितले की ज्या पहिल्या नमुन्यातून ओमिक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. ओमिक्रॉन या विषाणूनची लागण झालेले रुग्ण आता बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेत  आढळत आहेत.

इतर बातम्या :

राज्यांशी समन्वय साधून आरोग्य सुविधांचा आढावा घ्या; कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आदेश

Corona : ओमिक्रॉन व्हेरिएंट आला असतानाच मोठी बातमी, एकाच कॉलेजमधील 281 विद्यार्थ्यांना कोरोना

बायकोला मारझोड करणं कितपत योग्य? देशभरातल्या धक्कादायक सर्व्हेक्षणची जोरदार चर्चा


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI