जीन्सप्रकरण भोवले, अखेर मुख्यमंत्री रावत यांची माफी; म्हणाले…

फाटक्या जीन्सवरून केलेलं वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या चांगलच अंगलट आलंय. (Tirath Singh Rawat apology on ripped jeans controversary)

जीन्सप्रकरण भोवले, अखेर मुख्यमंत्री रावत यांची माफी; म्हणाले...
Tirath Singh Rawat, Uttarakhand Chief Minister
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 4:11 PM

डेहराडून: फाटक्या जीन्सवरून केलेलं वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या चांगलच अंगलट आलंय. रावत यांच्यावर देशभरातून टीका झाल्यानंतर अखेर त्यांनी माफी मागितली आहे. (Tirath Singh Rawat apology on ripped jeans controversary)

माझं विधान भारतीय मूल्य आणि संस्कृतीच्या संदर्भाने होते. तरीही माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

पत्नीकडून समर्थन

मुख्यमंत्री झाल्यानंतर रावत यांच्या पहिल्याच विधानाने वाद उठल्यानंतर त्यांची पत्नी रश्मी रावत यांनी त्यांचं समर्थन केलं होतं. रावत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्यांनी ज्या संदर्भाने रिप्ड जीन्सबाबत विधान केलं होतं. त्याचा अर्थ समजून घेतला गेला नाही, असं रश्मी रावत यांनी म्हटलं होतं.

काय होतं वादग्रस्त विधान?

रावत यांनी 17 मार्च रोजी देहरादून येथील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केलं. तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली. “मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता”, असं रावत म्हणाले. “मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था (NGO) चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार?”, असा सवाल त्यांनी केला.

प्रियांका गांधींचे चिमटे

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय परिवह मंत्री नितीन गडकरी यांचे संघातील फोटो शेअर केले आहेत. संघाच्या कार्यक्रमात पांढरा शर्ट आणि खाकी पँटीत हे नेते आहेत. हाफ पँटीतील त्यांचे फोटो आहेत. हे फोटो शेअर करून त्यावर, अरे देवा!!! गुडघे दिसत आहेत, असं कॅप्शन प्रियंका गांधी यांनी दिलं आहे. (Tirath Singh Rawat apology on ripped jeans controversary)

संबंधित बातम्या:

मोदींचा हाफ चड्डीतला फोटो शेअर करत प्रियंका गांधींचे भाजप नेत्यांना चिमटे

VIDEO: गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार; भाजपच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? उर्मिला मातोंडकरांचं खोचक ट्विट

(Tirath Singh Rawat apology on ripped jeans controversary)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.