AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा मृत्य, तीन जण जखमी

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दुचाकीस्वाकाचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातातून प्रल्हाद सिंह पटेल हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांनादेखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पण ते सुखरुप आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

केंद्रीय मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा मृत्य, तीन जण जखमी
| Updated on: Nov 07, 2023 | 7:01 PM
Share

भोपाळ | 7 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्यासोबत आज मोठी अपघाताची घटना घडलीय. या अपघातात ते सुदैवाने बचावले आहेत. पण एका दुचाकीस्वाराचा या अपघातात मृत्यू झालाय. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. प्रल्हाद सिंह पटेल हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून ते सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. पण संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे घडली आहे.

प्रल्हाद सिंह यांचा ताफा छिंदवाडा येथून नरसिंहपूरच्या दिशेला जात होता. यावेळी समोरुन अचानक एक दुचाकीस्वार आला. त्या दुचाकीस्वाकाला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रल्हाद सिंह पटेल यांची गाडी रस्त्याच्या खाली उतरली. पण तरीही ही दुर्दैवी घटना घडलीच. या अपघातात 35 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच निवडणुकीच्या निमित्ताने प्रल्हाद सिंह पटेल हे छिंदवाड्यात आले होते. ते छिंदवाडा येथून कार्यक्रम आटोपून नरसिंहपूर जात होते. या दरम्याव संबंधित अपघाताची घटना घडली. विशेष म्हणजे प्रल्हाद पटेल हे नरसिंहपूरच्या मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार देखील आहेत. पण त्यांच्यासोबत आज ही अनपेक्षित आणि दुर्देवी घटना घडली आहे.

या अपघातात नुकसानग्रस्त झालेल्या फॉर्च्यूनर कारचा व्हिडीओ देखील समोर आलाय. गाडीला बसलेली धडक इतकी मोठी आहे की गाडीच्या पुढच्या भागाचं प्रचंड नुकसान झालंय. व्हिडीओत एक व्यक्ती प्रचंड जखमी दिसत आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झालाय.

दरम्यान, मध्य प्रदेशात जोरदार प्रचाराचा धुराळा सुरु आहे. राज्यातील 230 विधानसभा मतदारसंघांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोमाने काम करत आहेत. भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बसपा पक्षाने अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारांना निवडणुकीच्या रणांगणात उतारलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.