२४ फेब्रुवारीला लग्न, २५ ला नवरा झाला ‘बाप’, वधूचे बिंग फुटल्याने नवरोबाची सटकली, थेट लावला फोन…
मोठ्या थाटामाटात लग्न झाले आणि हनीमूनच्या रात्री अचानक नववधूच्या पोटात दुखायला लागले. वराला समजेना नेमके काय चालले आहे. लग्न घरातील वातावरण तणावग्रस्त झाले. वराच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

लग्नाच्या रेशीम गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात असे म्हटले जाते. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सात फेरे घेतल्यानंतर नववधू आणि वराने भावी संसाराची स्वप्नं रंगविणे सुरु केले. लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्रीच अनोखा विचित्र प्रकार सुरु झाला आणि नववधूला प्रसवकळा सुरु झाल्या. हा काय नवा प्रकार म्हणून वराच्या घरातील मंडळींची धावपळ सुरु झाली. काय घडले नेमके पाहा….
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका तरुणाचे वाजतगाजत लग्न झाले. त्यानंतर हनीमूनच्या रात्री नववधूच्या पोटात प्रसव कळा सुरु झाल्या. वराला समजेना नेमके काय चालले आहे. लग्न घरातील वातावरण तणावग्रस्त झाले. वराच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आई झालेल्या वधूची ही बातमी जंगलातल्या आगी सारखी पंचक्रोशीत पसरली.
करछना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका तरुणाचे २४ फेब्रुवारीला लग्न झाले, आणि २५ फेब्रुवारीला त्याने त्याच्या नववधूला घरी आणले. मधूचंद्राच्या रात्रीला वधूच्या पोटात दुखू लागले. पहिल्यांदा वराने दुलर्क्ष केले. त्यानंतर सहन न झाल्याने वराने थेट सासुरवाडीला फोन लावला.त्यानंतर कुटुंबिय वधूला घेऊन दवाखान्यात पोहचले. वधूला तपासून डॉक्टरांनी पोटात नऊ महिन्याचे बाळ असून कोणत्याही क्षणी डिलीव्हरी होऊ शकते असे सांगितले.त्यानंतर वराचे आणि वराकडच्या मंडळींचे तोंडचे पाणी पळाले. थोड्याच वेळात वधूने बाळाला जन्म दिला.
पत्नीला बाळासह माहेरी पाठविले
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अशा प्रकारे पत्नीला बाळ झाल्याने नवऱ्याचे धाबे दणाणले. त्याने सासूरवाडीच्या लोकांना फोन करुन लावले.त्यानंतर बाळाला आणि वधूला त्याने माहेरी पाठविले. आता गावभर या गोष्टीची चर्चा सुरु झाली आहे. परंतू दोन्ही पक्षापैकी कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही.
मुलीचा पिता म्हणाला मूल जावयाचे आहे
या कहाणीत मोठा ट्वीस्ट आहे. वधूच्या पित्याचा दावा आहे की लग्न मे २०२४ रोजी ठरले होते. त्यानंतर मुलगी आणि मुलाचे वारंवार भेटणे सुरु झाले होते. त्यामुळे हे मुल वराचे आहे असा दावा वधूच्या पित्याने केला आहे. परंतू आता वर यागोष्टीला राजी नाही. मुलाच्या वडीलांनी सूनेला स्वीकारण्यास नकार दिला आहे.या वादाला मिठविण्यासाठी पंचायत देखील बोलविण्यात आली आहे.परंतू काहीच निर्णय झालेला नाही…
