AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतराळवीर डायपर का घालतात ? काय खातात-पितात ? कसा वेळ घालतात

अंतराळात अंतराळवीरांचे जीवन कसे असते. त्यांचा रुटीन कसा असतो. ते काय खातात पितात ? या विषयी सामान्यांना खूप कुतुहल आहे. पाहा कसा असतो त्यांचा दिवस

अंतराळवीर डायपर का घालतात ? काय खातात-पितात ? कसा वेळ घालतात
astronaut food Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 07, 2023 | 4:07 PM
Share

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : नुकतेच आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून सहा महिने वास्तव्य करणारे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. अमेरिकेच्या नासाने चंद्रावर आतापर्यंत 12 अंतराळवीरांना पाठविले आहे. परंतू अंतराळात अंतराळवीर आपला वेळ कसा घालवतात. काय खातात पितात. तेथील जेवण पृथ्वीसारखेच असते का ? अंतराळात अंतराळवीर डायपर का घालतात ? त्यांना टॉयलेटल जाता येते का ? नेमके कसे असते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील अंतराळवीरांचे जीवन पाहूयात

आधी पाहूयात अंतराळवीरांच्या स्पेस सुटचे वैशिष्ट्ये. आपण अनेकदा पाहीले आहे की अंतराळवीरांचे स्पेस सुट पांढऱ्या किंवा ऑरेंज रंगाचे असते. ऑरेंज सूटला एडव्हान्स क्रु एस्केप सुट किंवा ACES म्हटले जाते. या सुटला केवळ लॉंचिंग आणि लॅंडींग वेळी घातले जाते. किंवा अंतराळात केवळ शटलच्या आत घातले जाते. दुसरा पांढरा स्पेस सुट ज्याला एक्स्ट्राव्हेक्युलर अक्टीविटी सुट किंवा EVA म्हटले जाते. या सुटला स्पेसवॉक किंवा इतर एक्टीविटी दरम्यान घातले जाते.

सफेद कलरचा सुट का ? अंतराळात अनेक ठिकाणी तापमान 135 डिग्री सेल्शिअस तापमान असते, तेव्हा अंतराळवीरांना त्रास होऊ नये म्हणून पांढऱ्या रंगाचा स्पेस सुट असतो. पृथ्वीवर उन्हाळ्यात सफेद कपडे दिलासा देतात तसेच अंतराळातही ते दिलासा देतात. नासाच्या मते अंतराळात स्पेस सुट चेंबरसारखा काम करतो. त्यांना थंडी, उष्णता आणि उल्कांपासून वाचवितो. तसेच अंतराळातून कम्युनिकेशनची त्यात व्यवस्था असते. त्यात ऑक्सीजन, पाणी आणि बॅटरी बॅकअप असतो.

स्पेस सुटचे वजन किती ?

स्पेस सुटचे वजन सुमारे 82 किलोग्रॅमच्या आसपास असते. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण असल्याने ते जाणवते परंतू अंतराळात त्याचे काही वजन भासत नाही. स्पेस सुट घालायला 45 मिनिटे लागतात. अंतराळात अंतराळवीरांना लिफ्ट ऑफ, लॅंडींग आणि स्पेस वॉक करताना मॅग सुट घालावे लागतात. तेव्हा त्यांना टॉयलेटला जाता येत नाही त्यामुळे त्यांना डायपर घातले जाते. अंतराळवीरांना तीन मॅग सुट दिले जातात. लॉंचिंग, लॅंडींग आणि स्पेसच्या वापरासाठी हे तीन सुट घातले जातात.

दिवसाची सुरुवात कधी होते ?

अंतराळात दिवसाची सुरुवात सकाळी 6 वा. होते. अकरा तास काम केले जाते. रात्री 9.30 वाजता ते झोपतात. अंतराळात पोष्टीक जेवण दिले जाते. ड्राय फ्रूट्स, पीनट बटर, चिकन, बीफ, सी-फूड्स, कॅंडी आणि ब्राऊनी असे पदार्थ असतात. ड्रिंक में कॉफी, चाय, ऑरेंज जूस, लॅमोनेड आणि फ्रूट पंचचा समावेश असतो. परंतू ते रेडी टू इट स्वरुपात बनवलेले असतात.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.