महिलांना ‘या’ दिवशी मिळणार 2500 रुपये, लेटेस्ट अपडेट आली; पण कुठे?
दिल्लीतील महिलांना 2500 रुपये कधीपासून मिळणार याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारची याबाबत तयारी पूर्ण झाली आहे.

दिल्लीतील महिलांना 2500 रुपये कधीपासून मिळणार याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारची याबाबत तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवसापासून दिल्लीत महिला सन्मान योजना लागू करू असं म्हटलं होतं, त्याच दिवसापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. त्याच दिवसापासून या योजनेच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे.
भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्चला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या महिला सन्मान योजनेची घोषणा करणार आहेत. दिल्लीमध्ये आठ मार्चपासून या योजनेच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. महिलांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिल्ली सरकार या नव्या योजनेंतर्गत तेथील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2500 रुपये जमा करणार आहे.
दरम्यान या योजनेवरून आम आदमी पार्टीचा भाजपवर हल्लाबोल सुरूच आहे. महिलांना आता 2500 हजार रुपये कधी मिळणार? असा सवाल वारंवार आपच्या वतीनं भाजपला केला जात आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी देखील या योजनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. महिलांना 2500 हजार रुपये कधी मिळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आमची सत्ता आली तर दिल्लीतील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला अडीच हजार रुपये जमा होतील अशी गॅरंटी दिली आहे, ती गॅरंटी दिल्ली सरकार आता पूर्ण करणार का? असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान सध्या सर्व महिलांचं लक्ष आता या योजनेच्या अंमलबजावणीकडेच लागलं आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सभागृहात या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे, सरकार लवकरच या योजनेची अंमलबजावणी करणार आहे, आम्ही जाहिरनाम्यात ज्या घोषणा केल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करणार आहोत असं रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे.
