BLOG : “मी 80 वर्षांच्या व्यक्तीला वाचवणारी नाही आणि 30 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूलाही मी कारणीभूत नाही”

तुमच्याकडे बेड मिळेल का? रेमडेसिवीर इंजक्शन मिळेल का? तुमच्याकडे व्हेंटिलेटर बेड आहे का? अशा प्रश्नांपासून सुरु होणारा दिवस अशा प्रश्नांना निरुत्तर करुनच संपतोय.

BLOG : मी 80 वर्षांच्या व्यक्तीला वाचवणारी नाही आणि 30 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूलाही मी कारणीभूत नाही
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 3:28 AM

तुमच्याकडे बेड मिळेल का? रेमडेसिवीर इंजक्शन मिळेल का? तुमच्याकडे व्हेंटिलेटर बेड आहे का? अशा प्रश्नांपासून सुरु होणारा दिवस अशा प्रश्नांना निरुत्तर करुनच संपतोय. माणसाचे निसर्गावर मात करण्याचे निरर्थक प्रयत्न चाललेत आणि मग माणसाच्या शुल्लक अस्तित्वाची जाणीव करून देतोय निसर्ग असं वाटतंय आणि तेच खरंय! जेव्हा जेव्हा पृथ्वीवर एखाद्या प्राण्याचा उद्रेक वाढलाय, स्वैर संचार वाढलाय आणि त्यामुळे पृथ्वीचं संतुलन (Eco balance) जातोय असं वाटतंय तेव्हा तेव्हा निसर्गाने रौद्र रूप धारण केलंय. मनुष्यप्राणी याला अपवाद नाही! (Blog by Dr Madhavi Pandare Kharade on Doctor experiences from Covid ICU department)

‘अतिरेकानंतर भूकंप, वादळं आणि प्रलयं आली आणि रातोरात डायनासोर नष्ट’

खुप खुप वर्षांपूर्वी असंच जेव्हा डायनासोरचा (Dinosaurs) अतिरेक झाला होता. जमिनीवर डायनासोर, हवेतही डायनासोर उडतायेत. सगळीकडे नुसते डायनासोरच डायनासोर.. त्यामुळे पृथ्वीवरील इतर प्राण्यांना, पक्षांना जगणं अवघड झालं होतं. निसर्गाचं संतुलन हरवलं आणि मग धरतीने रौद्र रूप धारण केलं. भुकंप आले, वादळं आली, प्रलय आले आणि रातोरात सगळे, अगदी सगळे डायनासोर नष्ट झाले!

धरतीने परत रौद्र रूप धारण केलंय का?

जमिनीवर वावरणारे प्राणी, आकाशात उडणारे सुंदर पक्षी, अखंड वाहणाऱ्या नद्या, धीरगंभीर समुद्र, विशाल पर्वत. सगळीच निर्मिती किती सुंदर, सुबक आणि सुनियोजित! मोठा हत्ती त्याच्या विश्वात आनंदी. तसंच छोट्याशा मुंगीताई त्यांच्या विश्वात आनंदी. जसं विशाल वडाचं शेकडो वर्षे असणारं अस्तित्व, तसंच रानातल्या नाजूक फुलाचं 2-3 दिवस असणारं अस्तित्व! प्रत्येक जण आपापल्या छोट्या- मोठ्या रुपात, काळ्या-गोऱ्या, लाल-निळ्या रंगात, जितके दिवस, महिने, वर्ष आयुष्य आहे त्या अस्तित्वात किती आनंदाने राहत आहेत. कुणीही एकमेकांना त्रास न देता, प्रत्येकाचं अस्तित्व जपतोय!

“माणूस निसर्गाचा एक भाग, तो निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाही”

आपण मनुष्यप्राणी या सृष्टीचा केवळ एक भाग आहोत. आपण निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाहीत. आपल्याला असलेला सुंदर रंग, रुप, आयुष्य आणि अस्तित्वाचा आनंद घेत आपणही जगलं पाहिजे मान्य आहे. आपण निसर्गाच्या अनेक कलाकृतींपैकी एक उत्कृष्ट कलाकृती आहोत. जे जे या फुलांत आहे, प्राण्यात आहे तेच इतर माणसात आहे. तोच Presence, तोच Consciousness, तिच Space आणि तिच्याभोवती फिरणारे Electrons, Protons, Neutrons, तीच Energy. तीच शक्ती.. तोच अल्ला.. तोच देव.. तेच तर आहोत आपण सगळे!

अहं भोजनं,नैव भोज्यं,न भोक्ता.. अहं निर्विकल्पं,निराकार रूपं… चिदानंद रुपं ,शिवोहं शिवोहं !

शंकराचार्यांनी किती समर्पक वर्णन केलंय

“जसं रुग्णाला कुटुंब, तसं डॉक्टरलाही असतं”

अरे मग कसली ही ओढाताण निसर्गाविरुद्ध? कसला हा गर्व? एकमेकांवर चढाओढ करण्यासाठीचा कसला हा अट्टाहास? कोण Patient, कोण Doctor, कोण श्रेष्ठ, कोण ज्येष्ठ कसं असू शकेल? सगळेच तर सारखे! जी भीती तुला आहे, मला आहे, तिच भीती रुग्णाला आणि डॉक्टरलाही आहे. तुझे आई वडील, भाऊ, बहिण, नवरा, बायको, तुझी मुलं, तुझा संसार, तुझं घर, तुझी नाती. ती सुटू नये म्हणून तुझा प्रयत्न. या सगळ्यांचा मोह तुला जितका आहे, तितकाच मलाही आहे रे. फक्त नियतीने आज तुला रुग्ण केलंय आणि मला डॉक्टर.

“… पण मृत्यू रोखणं माझ्या हातात नाही”

पण एक गोष्ट लक्षात घे. कर्मन्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गीतेतील दुसऱ्या अध्यायाप्रमाणे एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे माझ्या डॉक्टरी ज्ञानाप्रमाणे आणि अनुभवप्रमाणे माझ्या 100 टक्के मानवी क्षमतेने मी तुझ्यावर उपचार करत आहे. तुला ऑक्सिजन देणार, रेमडेसिवीर इंजेक्शन देणार, तुला व्हेंटिलेटरवर ठेवणार. सगळं सगळं अगदी 100 टक्के क्षमतेने करणार. पण… पण मृत्यूला रोखणे माझ्या हातात नाहिये रे. याची लक्ख जाणीव मला झालीये.

“मी 80 वर्षांच्या व्यक्तीला वाचवणारी नाही आणि 30 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूलाही मी कारणीभूत नाही”

एखादी सगळं आयुष्य छान जगलेली 80 वर्षाची व्यक्ती एकदम बरी होते आणि कधी कधी अर्धवट आयुष्य जगलेल्या 30 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे म्हणत! 80 वर्षांच्या व्यक्तीला वाचवणारीही मी नाही आणि त्या 30 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूतही मी नाही. यशाचं श्रेयही निसर्गाच्या स्वाधीन आणि अपयशाचं शल्यही निसर्गाच्याच स्वाधीन! मी एक डॉक्टर केवळ निमित्तमात्र!

हेही वाचा :

कर्तव्यासाठी काहीही, बालाघाटच्या महिला डॉक्टरचा भर उन्हात 7 तास प्रवास, नागपूरला पोहचून लगेच रुग्णसेवा

VIDEO | मुंबईत भगवतीच्या डॉक्टरांना शिवसेना नगरसेविकेची दमदाटी, महापौरांकडून समज, संध्या दोषींचा माफीनामा

आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेत नोकरीची संधी, एक मुलाखत आणि मुंबई महापालिकेत नोकरी पक्की

व्हिडीओ पाहा :

Blog by Dr Madhavi Pandare Kharade on Doctor experiences from Covid ICU department

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.