AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिने नकार दिला पण त्याने ऐकलं नाही, मनोहर भोसलेच्या आश्रमाच्या खोलीतच नको ते घडायचं

सोलापूरमधील करमाळा येथील भोंदूबाबा मनोहर भोसलेविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेने केलेल्या या तक्रारीत धक्कादायक खुलासा झाला आहे. या भोंदूबाबाच्या आश्रमातील खोलीत नको ते घडत होतं. आता नेमकं कायच घडलं? जाणून घ्या...

| Updated on: May 26, 2026 | 11:13 AM
Share
गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनेक ढोंगी बाबांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील मनोहरमामा भोलसे याचे देखील कांड समोर आले. आता या भोंदूबाबावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका महिलेच्या असहाय्यतेचा फायदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

1 / 5
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना जानेवारी २०२५ च्या सुमारास घडली आहे. आर्थिक संकटात असलेल्या आणि चांगल्या रोजगाराच्या शोधात असलेल्या या महिलेला तिच्या एका मैत्रिणीने पुण्यातील वडाचीवाडी येथील भोंदूबाबा मनोहर भोसले याला भेटण्याचा सल्ला दिला होता. बाबा आपल्या सर्व अडचणी दूर करेल या भाबड्या आशेने या महिलेने त्याच्या आश्रमात जाण्यास सुरुवात केली. तिचा विश्वास संपादन करून भोसले याने तिला आश्रमातच राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली आणि विविध धार्मिक विधींचे कारण सांगून तिच्याकडून तब्बल अकरा हजार रुपये उकळले.

2 / 5
आर्थिक लूट केल्यानंतर या नराधमाने अत्यंत घृणास्पद कृत्य केले. एक दिवस पहाटेच्या वेळी तो थेट पीडितेच्या खोलीत शिरला आणि एका विशेष पूजेचा बहाणा करून त्याने तिला कपडे काढण्यास सांगितले. महिलेने या प्रकाराला तत्काळ आणि तीव्र विरोध केला. मात्र भोसले याने तिचे काहीही न ऐकता तिच्यावर बळजबरी केली आणि अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर, या घटनेबाबत बाहेर कोणालाही काहीही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने या असहाय्य महिलेला दिली.

3 / 5
या भयंकर प्रसंगामुळे आणि आरोपीच्या धमक्यांमुळे ही महिला प्रचंड दहशतीखाली होती. अखेर मागील जवळपास दीड वर्षे घाबरून राहिल्यानंतर तिने धाडस एकवटून करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या नराधमाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.

4 / 5
तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनोहर भोसले याच्यावर बलात्कार, फसवणूक, मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. करमाळा पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या भोंदूबाबाने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ