सिंदूरच्या जागी वापरली लिपस्टिक तर नवऱ्याने भरली स्वत:ची भांग.. बॉलिवूडमधील अजबगजब लग्न

आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. नुपूर आठ किलोमीटर धावत विवाहस्थळी पोहोचला होता. याआधीही बॉलिवूडमध्ये असे अजबगजब लग्नाचे किस्से पहायला मिळाले. कोणी सिंदूर विसरल्याने लिपस्टिकने भांग भरली तर कोणी महिला पंडिताला बोलावलं.

| Updated on: Jan 16, 2024 | 8:52 AM
आमिर खानची लाडकी लेक आयरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. आयरा आणि नुपूर शिखरेचं लग्न विविध कारणांमुळे चर्चेत आलं आहे. या लग्नात फारच वेगळ्या गोष्टी पहायला मिळाल्या. मात्र याआधीही बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेकांनी अनोख्या पद्धतीने लग्न केलं.

1 / 6
आयरा खान-नुपूर शिखरे- आमिर खानच्या लेकीशी लग्न करताना नुपूर शिखरे हा वरात घेऊन घोडीवर किंवा गाडीने आला नव्हता. तर तो विवाहस्थळापर्यंत चक्क धावत आला होता आणि त्याच टी-शर्ट, शॉर्ट पँटवर त्याने आयराशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. यावेळी आयराचे कपडेही लक्षवेधी ठरले होते.

2 / 6
राजकुमार राव आणि पत्रलेखा- अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नातही अशा काही अनोख्या गोष्टी घडल्या. या लग्नात वधूच्या डोक्यावरील फुलांची चादर भावंडांनी नाही तर बहिणींनी उचलली होती. इतकंच नव्हे तर राजकुमार रावने पत्नी पत्रलेखाच्या भांगेत सिंदूर भरल्यानंतर स्वत:च्या भांगेतही सिंदूर भरला होता. हे पाहून प्रत्येकजण हैराण झाला होता.

3 / 6
शम्मी कपूर आणि गीता बाली- अभिनेते शम्मी कपूर आणि गीता बाली यांनी अचानक मुंबईतल्या वाळकेश्वर इथल्या बाणगंगाजवळच्या मंदिरात पहाटे लवकर लग्न केलं. कुटुंबीय या लग्नाला नकार देतील अशी भीती शम्मी कपूर यांना होती. म्हणूनच त्यांनी गुपचूप लग्न उरकलं होतं. मात्र घाईगडबडीत सिंदूर सोबत घ्यायला विसरल्याने त्यांनी गीता बाली यांची भांग लिपस्टिकने भरली होती.

4 / 6
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन- 'जंजीर' हा चित्रपट हिट झाला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लंडनला फिरायला जायचं, असं अमिताभ बच्चन यांनी ठरवलं होतं. मात्र बिग बींच्या वडिलांनी नकार दिला होता. जर लंडनला जायचं असेल तर जया बच्चन यांच्यासोबत लग्न करून जावं लागेल, अशी अट त्यांनी घातली होती. म्हणूनच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी घाईगडबडीत लग्न केलं.

5 / 6
दिया मिर्झा आणि वैभव रेखी- दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांच्या लग्नाला इको-फ्रेंडली असंही म्हटलं जातं. कारण या लग्नात बायोडिग्रेडेबल आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आला होता. इतकंच नव्हे तर एका महिला पंडिताने लग्नाचे विधी पार पाडले होते. या जोडीने लग्नात आलेल्या पाहुण्यांना मेघालयहून मागवलेल्या खास हँडीक्राफ्ट लाकडाच्या बास्केटमध्ये रोपटं भेट म्हणून दिलं होतं.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.