PHOTO | चंद्रकला पैठणीत खुललं अप्सरेचं सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक!

पैठणी म्हटलं की स्त्रीचं सौंदर्य अभिक खुलून येतं. सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळ्यांची रेलचेल सुरु आहे. अशाच एका रंगारंग पुरस्कार सोहळ्यासाठी सिनेसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) खास काळ्या रंगाच्या पैठणीमध्ये सजली होती.

1/5
पैठणी म्हटलं की स्त्रीचं सौंदर्य अभिक खुलून येतं. सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळ्यांची रेलचेल सुरु आहे. अशाच एका रंगारंग पुरस्कार सोहळ्यासाठी सिनेसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) खास काळ्या रंगाच्या पैठणीमध्ये सजली होती.
2/5
या साडीत सोनालीने फोटोशूट देखील केलं. सोनालीच्या या खास फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काळ्या रंगाच्या या चंद्रकला पैठणीमध्ये सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. या लूकला साजेसा हटके ब्लाऊज आणि केसांत माळलेला मोगऱ्याच्या गजऱ्यामुळे सोनाली खुपच मनमोहक दिसतेय.
3/5
सोनालीने एका पुरस्कार सोहळ्यासाठी हा खास लूक केला आहे. भेट म्हणून आलेली पैठणी आणि दागिने सोनालीने या सोहळ्यासाठी परिधान केले आहेत. काळ्या रंगाच्या कॉटन पैठणीवर शोभून दिसेल असा तिने अगदी साधा मेकअप केला आहे.
4/5
सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.
5/5
मागील वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निम्मिताने सोनालीने आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कुणाल आणि सोनालीचा दुबईत साखरपुडा झाला होता. कुणाल मूळचा लंडनमधील असून तो दुबईत सिनिअर ऍडजस्टर म्हणून काम करतो. आता इतर कलाकारांसारखे सोनाली आणि कुणाल कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.