Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या सणाच्या निमित्ताने आज बहुतांश मंदिरात फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची सजावट केली जाते. (Akshaya Tritiya Temple Decoration with mango)

1/11
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या सणाच्या निमित्ताने आज बहुतांश मंदिरात फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची सजावट केली जाते.
2/11
ही आरास पाहण्यासाठी भक्तांची मोठी रांग पाहायला मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
3/11
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.
4/11
पण कोरोनाचे सावट पाहता साध्या पद्धतीने मंदिरातच अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
5/11
त्यामुळे अनेक भाविक रस्त्यावरुनच बाप्पाचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी या आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयात रुग्णांना दिला जातो.
6/11
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव होणार आहे.
7/11
अक्षय्य तृतीया निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात 6 हजार 551 हापूस आंब्याची सजावट करण्यात आली आहे.
8/11
पुणे येथील श्री विठ्ठल भक्त विनायक काची यांनी आज सकाळी 6 हजार 551 हापूस आंब्यांनी आणि पाना-फुलांनी सजवण्यात आले आहे.
9/11
यात श्री. विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी, परिवार देवता यांची सजावट केली.
10/11
त्यामुळे मंदिराला आमराईचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या आंब्याच्या सजावटीत श्री विठ्ठलाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
11/11
मात्र कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर श्री विठ्ठल मंदिर बंद असल्याने हे आंबे प्रसाद म्हणून अनाथश्रम तसेच झोपडपट्टी, वृध्दाश्रम येथे प्रसाद म्हणून वाटप केले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.