Photo : अंबानी कुटुंबातील अजून एक विवाह सोहळा, अनमोल अंबानी आणि कृशा शाह विवाहबंधनात; दिग्गजांची हजेरी

उद्योजक अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी आणि कृशा शाह यांचा विवाह रविवारी पार पडला. लग्नानंतर अनमोल आणि कृशाचा पहिला फोटो समोर आलाय.

Feb 21, 2022 | 10:43 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Feb 21, 2022 | 10:43 PM

उद्योजक अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी आणि कृशा शाह यांचा विवाह रविवारी पार पडला. लग्नानंतर अनमोल आणि कृशाचा पहिला फोटो समोर आलाय. नव विवाहित दाम्पत्याचा फोटो पिंकी रेड्डीने शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनमोल आणि कृशा यांच्यासह अभिनेता अभिषेक बच्चनही पाहायला मिळतोय. (फोटो - इन्स्टाग्राम, ट्विटर)

1 / 5
लाल जोड्यात कृशा सुंदर दिसतेय. कुंदनची ज्वेलरी, हातात चुडा असा कृशाचा ब्रायडल मेकअप पाहायला मिळतो. तर अनमोल पांढरी शेरवानी आणि गुलाबी पगडी चांगलाच उठून दिसतोय. (फोटो - इन्स्टाग्राम, ट्विटर)

2 / 5
या लग्न सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यात बच्चन कुटुंबियांचाही समावेश होता. खुद्द अमिताभ बच्चून, अभिषेक बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन यांनी या लग्नाला हजेरी लावली. त्याचबरोबर भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, खासदार सुप्रिया सुळे या देखील विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या. (फोटो - इन्स्टाग्राम, ट्विटर)

3 / 5
मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या कृशा शाह ही सामाजिक कार्यकर्ती आणि उद्योजक आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती Dysco या सोशल नेटवर्किंग कंपनीची संस्थापक आहे. (फोटो - इन्स्टाग्राम, ट्विटर)

4 / 5
पूर्वी, कृशा यूकेमध्ये एक्सेंचरसाठी काम करायची आणि नंतर उद्योजक बनण्यासाठी देशात परतली. तिने #Lovenotfear नावाची मानसिक आरोग्य मोहीम देखील सुरू केली आहे. कोविड-19 साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ही मोहिम राबवण्यात येते. कृशा ही कॅलिफोर्निया विद्यापीठाची राजकीय अर्थशास्त्रात पदवीधर आहे. (फोटो - इन्स्टाग्राम, ट्विटर)

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें