सिक्कीमला जाण्याचा प्लॅन बनवत आहात?, मग ‘या’ ठिकाणांना आवश्य भेट द्या

तुम्ही जर सिक्कीम किंवा गंगटोकला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर आज आम्ही तुम्हाला येथील अशा काही पर्यटनस्थळांची माहिती सांगणार आहोत, की जीथे तुम्ही न चुकता आवश्य जायलायच हवे. सिक्कीममध्ये जाऊन देखील तुम्ही या ठिकाणांना भेट न दिल्यास तुमची ट्रीप ही अपूर्ण राहू शकते.

Jan 28, 2022 | 6:15 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 28, 2022 | 6:15 AM

गंगटोक : गंगटोक हे सिक्कीम (Sikkim) राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरावर निर्सगाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. गंगटोक ( Gangtok) परिसरामध्ये अनेक पर्यटनस्थळे असून, दरवर्षी हजारो पर्यटक या शहराला भेट देण्यासाठी येत असतात. आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असेच हे ठिकाण आहे.

1 / 5
कांगचेनजंगा : कांगचेनजंगा हे नाव जगभर प्रसिद्ध आहे. हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर आहे, येथील निसर्ग अद्भूत असा आहे. नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटने वेढलेले हे शिखर आहे.  आजच्या काळात हे पर्यटनाचे एक अद्भुत ठिकाण मानले जाते. तुम्हाला दार्जिलिंग आणि गंगटोक येथून देखील कांचनजंगा शिखर दिसू शकते.

2 / 5
त्सोंगमो सरोवर :  जर तुम्ही गंगटोकला भेट देणार असाल, तर भारत-चीन सीमेवर असलेल्या  त्सोंगमो सरोवराला आवश्य भेट द्या. त्सोंगमो सरोवर हे एक अतिशय सुंदर असे सरोवर आहे. त्याच मार्गावर पुढे भारत-चीन सीमेवर एक मंदिर देखील आहे. या मंदिराला देखील तुम्ही भेट देऊ शकता. या परिसरात तुम्हाला भारतीय सैनिकांसह चीनचे देखील सैनिक दिसू शकतात.

3 / 5
ताशी व्ह्यू पॉइंट : ताशी व्ह्यू पॉइंट हा मध्य गंगटोकपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे.  हे एक अतिशय प्रेक्षणीय ठिकाण आहे, जिथून प्रवाशांना माऊंट सानिलोच आणि कांचनजंगा पर्वताचे दर्शन होते. तुम्ही कोणत्याही ऋतूत या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकता. ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस घालवायचे आहेत, अशा व्यक्तींनी एकदा तरी ताशी व्ह्यू पॉइंटला आवश्य भेट द्यावी.

4 / 5
रेशीमधील गरम पाण्याचा झरा : गंगटोक पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या रेशीमध्ये एक गरम पाण्याचा झरा आहे. सिक्कीम फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे हा झरा खास आकर्षण असतो. सिक्कीमध्ये येणारे जवळपास सर्वच पर्यटक या झऱ्याला भेट देतात. या परिसरात राहण्याची व खाण्याची सोय देखील स्वस्तात होत असल्याने इकडे कायमच पर्यटकांची गर्दी असते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें