AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! आता माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड, ज्या निकटवर्तीला पोलिसांनी उचललं तो कोण?

सध्या सगळीकडे अशोक खरात यांची चर्चा रंगली आहे. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्यांना अटक झाली. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मंत्र्याच्या निकटवर्तीला पोलिसांनी उचललं आहे.

| Updated on: Mar 24, 2026 | 5:40 PM
Share
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात याच्या महिलांवरील अत्याचार व लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरातच्या काळ्या कारनाम्यांची माहिती समोर येत असताना, प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातशी संबंधित व्हिडीओ आणि आरोपांनंतर पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता माजी मंत्र्याचे कनेक्शन समोर आले आहे.

1 / 5
अनेकांना प्रश्न पडला आहे की अशोक खरात प्रकरणात कोणत्या माजी मंत्र्याचे कनेक्शन समोर आले आहे. आम्ही ज्यांच्याविषयी बोलत आहोत ते माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाविषयी. त्याची चौकशी सुरू झाली आहे.

2 / 5
पोलिसांनी दीपक लोंढे या व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे. लोंढे हे शिवसेना (शिंदे गट)चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष तपास पथक (SIT) कडून त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली.

3 / 5
दीपक लोंढे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असलेले एजंट आहेत. खरात याने नाशिक जिल्ह्यात जमवलेल्या अफाट मालमत्तेत आणि संशयास्पद जमीन व्यवहारांमध्ये लोंढेचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. खरातच्या आर्थिक साम्राज्याशी संबंधित व्यावसायिक आणि आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करण्यासाठी ही चौकशी महत्वाची ठरत आहे.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, SIT पथक खरातने जमवलेल्या मालमत्तेच्या स्रोतांचा आणि जमीन व्यवहारांचा सखोल अभ्यास करत आहे. लोंढेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खरातच्या इतर राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खरातने 'न्यूमरोलॉजिस्ट' किंवा अंकशास्त्रज्ञ म्हणून नाशिकमधील अनेक प्रभावशाली व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असलेल्या व्यक्तींची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी