AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांब्यात अडकून तडफडणाऱ्या माकडाच्या पिलाची सुखरूप सुटका, समाधान गिरी ठरले देवदूत

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील लोणगाव डोणगाव येथून एक मन हेलावून टाकणारी पण तितकीच थरारक घटना समोर आली आहे.

| Updated on: May 27, 2026 | 1:18 PM
Share
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील लोणगाव-डोणगाव परिसरातून एक हृदयस्पर्शी आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माकडाच्या लहान पिलाच्या डोक्यात पाण्याचा तांब्या अडकल्याने त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. मात्र, स्थानिक प्राणीमित्राच्या तत्परतेमुळे या निष्पाप जीवाला नवजीवन मिळालं.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात फिरताना पाण्याच्या शोधात किंवा खेळता खेळता त्या माकडाच्या पिलाने तांब्यात डोकं घातलं असावं. मात्र, त्यानंतर तो तांब्या त्याच्या डोक्यात इतका घट्ट अडकला की पिलाला ना व्यवस्थित श्वास घेता येत होता, ना आजूबाजूला काही दिसत होतं. डोक्यावर तांब्या अडकल्यामुळे ते पिलू पूर्णपणे घाबरलं होतं आणि अन्न-पाण्याविना तडफडत होतं.

2 / 5
या प्रकारामुळे परिसरातही एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्राणीमित्र समाधान गिरी यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच समाधान गिरी यांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हे बचावकार्य सोपं नव्हतं. आपल्या पिलाच्या अवस्थेमुळे इतर माकडंही आक्रमक झाली होती. त्यामुळे त्या पिलाजवळ जाणं हे मोठं आव्हान ठरत होतं.

3 / 5
अत्यंत संयम आणि काळजीपूर्वक समाधान गिरी यांनी त्या पिलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्यांनी हळूहळू पिलाला ताब्यात घेतलं आणि त्याच्या डोक्यात अडकलेला तांब्या काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कौशल्याने आणि सावधगिरी बाळगत त्यांनी तांब्या अलगद बाहेर काढला. तांब्या निघताच त्या पिलाने मोकळा श्वास घेतला आणि काही क्षणांतच ते पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळालं.

4 / 5
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान गिरी यांच्या कार्याचं कौतुक केलं. त्यांच्या धाडसामुळे आणि वेळेवर केलेल्या मदतीमुळे एका मुक्या जीवाचा जीव वाचला. ही घटना पुन्हा एकदा माणुसकी आणि प्राण्यांविषयी असलेल्या संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण ठरली आहे.

5 / 5
Follow Us
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; पाऊण तास उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात नेमकं काय होतं?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...