AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही झोपेच्या प्रतीक्षेत जागता ? या कारणांमुळे रात्री लवकर झोप येत नाही

| Updated on: Dec 30, 2022 | 3:52 PM
Share
झोपेचे विकार आणि निद्रानाश ही अलीकडच्या काळात जगात वेगाने वाढणारी समस्या आहे. आपल्याला चांगले आरोग्य हवे असेल तर रात्री 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. पण बऱ्याच जणांना रात्री लवकर झोप येत नाही. झोप येण्याची प्रतीक्षा करत बरेच लोक एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत तळमळत राहतात.  रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात.

1 / 5
रात्री व्यायाम करण्याची सवय - अनेक लोकांना रात्री व्यायाम करण्याची सवय असते, त्यामुळेही नीट झोप न लागण्याची समस्या निर्माण होते. खरंतर रात्री व्यायाम केल्याने हृदयाची गती वाढते आणि मज्जासंस्थेला (नर्वस सिस्टीम) चालना मिळते. त्यामुळे शरीराला नीट विश्रांती घेता येत नाही.

2 / 5
फोनचा अधिक वापर - आजकाल लोकांचा मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. कामाचे फोन, मेल करणे, गेम खेळणे इथपासून ते ऑनलाइन शॉपिंग करण्यापर्यंत सर्व कामं फोनवर होतात, त्यामुळे दिवसातला बराचसा वेळ मोबाईलवरच जातो. काही लोकांना तर त्याची इतकी सवय असते की ते रात्रंदिवस मोबाईलवर असतात. यामुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो. खरंतर या गॅजेट्समधून निघणाऱ्या ब्लू लाइटमुळे झोप वाढवणाऱ्या मेलाटॉनिन या हार्मोनच्या पातळीचे नुकसान होते आणि यामुळेच बऱ्याच जणांना रात्री लवकर झोप येत नाही.

3 / 5
वाढतं वय - वाढत्या वयानुसार लोकांना झोपेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. वाढत्या वयानुसार अल्झायमरसारखे आजार वाढू लागतात. त्याच वेळी, जुनाट आजारांमुळे वेदना होणे आणि अस्वस्थ वाटणे यामुळेही झोपेवर परिणाम होऊ शकतो.

4 / 5
 उशीरापर्यंत काम करण्याची सवय  - काही लोकांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय असते तर काही लोक शिफ्टमध्ये काम करतात. त्यामुळे बॉडी क्लॉक बिघडते आणि झोप येण्यात अडचण निर्माण होते.

उशीरापर्यंत काम करण्याची सवय - काही लोकांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय असते तर काही लोक शिफ्टमध्ये काम करतात. त्यामुळे बॉडी क्लॉक बिघडते आणि झोप येण्यात अडचण निर्माण होते.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान