Marathi News Photo gallery Bollywood actor akshay kumar affected with corona virus shared this news on social media
Photo : बॉलिवूडचा खिलाडी कोरोनाच्या विळख्यात
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. (Bollywood actor Akshay Kumar is Affected with Corona virus)
यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचे नावाचा समावेश झाला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
2 / 6
“आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,” असे ट्वीट अक्षय कुमार याने केले आहे.
3 / 6
दरम्यान अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी अॅक्शन-अॅडव्हेंचर असलेल्या राम-सेतू या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक त्याने नुकतंच शेअर केला होता.
4 / 6
अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.
5 / 6
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारनं त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’साठी 120 कोटी मानधन घेतलं आहे.