पुढच्या काही दिवसांत श्रावण महिना चालू होणार आहे. महादेवाच्या भक्तीसाठी हा महिना फार पवित्र मानला जातो. भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवला जातो. येत्या 11 जुलैपासून श्रावण महिना चालू होत आहे. तर 9 ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपले. त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदावी यासाटी काही वस्तूंची खरेदी करावी.
1 / 5
भगवान शिवाला भस्म फार प्रिय असते. त्यामुळे श्रावण महिन्यात घरी भस्म नक्की घेऊन यावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
2 / 5
भगवान महादेवाच्या हातात नेमही डमरू असते. ज्या घरात डमरू असते, त्या घरात अशुभ गटना घडत नाही. डमरूच्या आवाजामुळे घरातील वातावरण तणावमुक्त राहते.
3 / 5
श्रावण महिन्यात घरी चांदी किंवा तांब्याचे त्रिशूळ आणू शकता.त्रिशूळाची पाजू केल्यावर वाईट शक्तींचा नाश होतो.
4 / 5
श्रावण महिन्यात घरात रुद्राक्ष जरूर घेऊन यावे.घरात रुद्राक्ष आणल्याने प्रगतीतील अडथळे दूर होतात. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)