या पृथ्वीतलावर अनेक चमत्कारिक ठिकाणं आहेत. यातील काही ठिकाणांना पाहून तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. चीन देशातही अशीच एक असामान्य जागा आहे. (फोटो सौजन्य- New China TV यूट्यूब चॅनेल)
1 / 6
ही जागा दिसायला फारच सुंदर आहे. अनेकजण ही जागा पाहण्यासाठी दुरून येतात. चीनमध्ये याला चेरहान सॉल्ट लेक असे म्हणतात. चीनच्या दाव्यानुसार हे त्यांच्या देशातील नैसर्गिक मीठ देणारे सर्वांत मोठे सरोवर आहे. (फोटो सौजन्य- New China TV यूट्यूब चॅनेल)
2 / 6
चीनमधील क्विंगघाई प्रांतात हे चेरहान सॉल्ट लेक आहे. हे सरोवर आकाराने एकूण 5856 स्क्वेअर किलोमीटर आहे. हे ठिकाण जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक मीठाच्या सरोवरांपैकी एक आहे. तसा दावा चीनकडून केला जातो. (फोटो सौजन्य- New China TV यूट्यूब चॅनेल)
3 / 6
या सरोवरावर जाताच तुम्हाला नैसर्गिकरित्या तयार झालेले मीठ मिळते. म्हणूनच हे ठिकाण अतिशय अद्भूत असे समजले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सरोवरावर सूर्याची किरणं पडताच पाण्याचा रंग बदलतो. (फोटो सौजन्य- New China TV यूट्यूब चॅनेल)
4 / 6
हे पाणी हिरवे होऊन जाते. हे सरोवर म्हणजे नैसर्गिक मिठाचा मोठा साठा आहे. त्यामुळेच चीनचे सैन्य या सरोवरावर पहारा ठेवून असते. (फोटो सौजन्य- New China TV यूट्यूब चॅनेल)
5 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा) (फोटो सौजन्य- New China TV यूट्यूब चॅनेल)