कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खा ‘हे’ चार पदार्थ, पाहा कसा होईल परिणाम

कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजेच बाहेरचं खाणं, व्यायाम न करणं, तळलेलं अन्न खाणं आणि आरोग्यदायी जीवनशैली याला कारणीभूत ठरू शकते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:29 PM, 22 Feb 2021
1/9
Foods For Cholesterol Control : हल्लीच्या खाण्याच्या पद्धतींमुळे शरीरात मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
2/9
कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे शरीराला मोठा धोका असतो. यामुळे हृदयविकाराचाही धोका आहे. पण तुम्हाला माहिती आहे का शरीरात कोलेस्टेरॉल असणंदेखील महत्वाचं मानलं जातं.
3/9
कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे एचडीएल आहे अर्थात चांगले कोलेस्ट्रॉल, एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल.
4/9
कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजेच बाहेरचं खाणं, व्यायाम न करणं, तळलेलं अन्न खाणं आणि आरोग्यदायी जीवनशैली याला कारणीभूत ठरू शकते.
5/9
यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला अशाच चार घरगुती उपयांबद्दल (Home Remedies) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता.
6/9
लसूण - लसूण कोलेस्टेरॉलसाठी खूप फायदेशीर आहे. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचा घटक असतो ज्यामुळे हृदयाच्या आर्टिज्म शुद्ध करण्याबरोबरच रक्तदाब सामान्य करण्याससुद्धा मदत होते.
7/9
ओट्स - आहारात ओट्स असणं फायदेशीर आहे. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो
8/9
कांदा - चवीसाठी जेवणामध्ये कांदा वापरला जातो. पण त्याचे अनेक आरोग्यादायी फायदेही आहेत. लाल कांद्या खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
9/9
अक्रोड - अक्रोड हे एक कोरडं फळ आहे. ज्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म आहेत. अक्रोड हे मेंदूसाठी उत्तम मानलं जातं. अक्रोड खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित होते. इतकंच नाहीतर अक्रोड हृदयासाठीही फायदेशीर आहे.