मराठमोळ्या साजासह पारंपारिक वेशभूषा!, ‘आई कुठे काय करते’मधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलं का?

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अनघा’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर एक नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील फोटो प्रचंड चर्चेत आले आहेत.

1/5

2/5
अश्विनी महांगडेने या फोटोशूटसाठी खास मराठमोळा साज परिधान केला होता. पारंपारिक नऊवारी साडी, गळ्यात ठुशी नाटकात नथ, कानात सुवर्णफुलं असा पारंपारिक लूक कॅरी केला होता. या लूकमध्ये अश्विनी एखाद्या राजघराण्यातील राणी प्रमाणे दिसत होती. अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

3/5
छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थादेखील चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत, याशिवाय गत वर्षी लॉकडाऊन दरम्यान देखील तिने लोकांची भरपूर मदत केली होती.

4/5
अभिनयासोबतच अश्विनी सामाजिक कार्यात देखील तितकीच सक्रिय आहे. आपण समाजाचं देणं लागतो, अशी गाठ पदराला बांधत ती या क्षेत्रात देखील खंबीरपणे उभी ठाकली आहे. या कठीण काळात कुणीच उपाशी राहू नये, म्हणून अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामुल्य जेवणाची व्यवस्था सुरु केली आहे.

5/5
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सामजिक कार्यासोबतच जनजागृतीचे कार्य देखील हाती घेतले आहे. स्त्रियांची मासिक पाली आणि त्यासंबंधातील अंधश्रद्धा-गैरसमज याबाबतीत जनजागृती करण्यासाठी तिने ‘महावारी’ नावाचा लघुपट तयार केला होता. याशिवाय दुर्गम भागांमध्ये जाऊन तिने स्वतःदेखील या विषयी जनजागृती केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI