PHOTO | नववधूचा साज तोंडावर मास्क, ‘लव लग्न लोच्या’मधील मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात!

लोकप्रिय मालिका ‘लव लग्न लोच्या’ फेम अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:14 PM, 4 May 2021
1/6
लोकप्रिय मालिका ‘लव लग्न लोच्या’ फेम अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
2/6
अभिनेत्री रुचिता जाधव मुमाबी स्थित व्यावसायिक आनंद माने (Anand Mane) यांच्याशी विवाह बंधनात अडकली आहे.
3/6
महाबळेश्वरच्या पाचगणी येथील एका फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला होता.
4/6
गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान रुचिता आणि आनंद याचे हे ‘अरेंज मॅरेज’ ठरले होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता.
5/6
3 मे रोजी ही जोडी विवाह बंधनात अडकली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
6/6
रुचिता जाधव हिने ‘लव लग्न लोच्या’सह ‘माणूस एक माती’, ‘मनातल्या’ उन्हात अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे.