PHOTO | मॉरीशसपासून ते टोरंटोपर्यंत, भारतच नाही तर जगातील ‘या’ देशातही अक्षय कुमारचे आलिशान बंगले!

केवळ भारतातच नाही तर, अक्षय कुमारने अनेक देशांमध्ये स्वत:साठी घर विकत घेतले आहे. त्यामध्ये अक्षय कुमारच्या मॉरिशस हाऊसचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मॉरिशसमध्ये अक्षय कुमारचे एक सुंदर घर आहे. हे घर समुद्राजवळ आहे.

1/6
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आज इंडस्ट्रीचा सर्वात मोठा स्टार आहे. अभिनेत्याचा प्रत्येक चित्रपट बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो. बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारला खिलाडी कुमार म्हणूनही ओळखले जाते, अक्षय कुमार देखील आपल्या हेल्दी जीवनशैलीसाठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. अक्षयने चित्रपटांमध्ये काम करता करता स्वत:साठी भरपूर मालमत्ता तयार केली आहे. संपूर्ण जगात अक्षय कुमारची अनेक घरे आहेत.

2/6
अक्षय गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. यासह, तो आपल्या कुटूंबासह मुंबईच्या जुहू येथील पेंट हाऊसमध्ये राहतो. हृतिक रोशन आणि साजिद नाडियाडवाला अक्षय कुमारचे शेजारी आहेत. अक्षयचा हा सी व्ह्यू फ्लॅट आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार अक्षय कुमारची एकूण संपत्ती 250 दशलक्ष डॉलर्स आहे.

3/6
अक्षय कुमार निसर्गावर खूप प्रेम करतो. म्हणूनच अक्षय कुमारने गोव्यात स्वत:साठी एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. या बंगल्याची किंमत 5 कोटी आहे. अक्षय बर्‍याचदा आपल्या कुटूंबासमवेत इथे जातो आणि चांगला वेळ घालवतो. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया असे आहे, हे फारच कमी लोकांना माहित आहे.

4/6
केवळ भारतातच नाही तर, अक्षय कुमारने अनेक देशांमध्ये स्वत:साठी घर विकत घेतले आहे. त्यामध्ये अक्षय कुमारच्या मॉरिशस हाऊसचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मॉरिशसमध्ये अक्षय कुमारचे एक सुंदर घर आहे. हे घर समुद्राजवळ आहे. अगदी क्वचितच अक्षय कुमार येथे जातो. पण अभिनेत्याचे असे म्हणणे आहे की, जेव्हा तो चित्रपटांमध्ये काम करणे थांबवले, तेव्हा तो मॉरिशसमध्ये जाऊन आराम करेल. अक्षय कुमारला मॉरिशसमध्ये राहणे खूप आवडते. सुरुवातीला अक्षय मॉरिशसमध्ये आपल्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी जायचा.

5/6
अक्षय कुमारकडे कॅनेडियन नागरिकत्व आहे. अक्षय त्याच्या नागरिकत्वाबद्दल बर्‍याच वेळा चर्चेचा विषय देखील बनला आहे. यासह अभिनेता बर्‍याच वेळा ट्रोल देखील झाला आहे. कॅनडामध्येही त्याचे स्वतःचे एक आलिशान घर आहे. परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अक्षयने येथे एक टेकडीचा एक संपूर्ण भाग विकत घेतला आहे. सध्या त्याने भारताच्या नागरिकतेसाठी अर्ज केला आहे. त्याने एका मुलाखतीच्या वेळी ही गोष्ट सांगितली होती की, त्याने भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता.

6/6
2017 मध्ये अक्षय कुमारने मुंबईच्या अंधेरी भागात स्वत:साठी आलिशान फ्लॅट घेतला. या फ्लॅटची किंमत साडेचार कोटी आहे. अभिनेत्याचा हे घर ट्रान्सकॉन ट्रायम्फ टॉवरच्या 38व्या मजल्यावर आहे. 1999मध्ये अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत आणि आज तो बॉलिवूडचा एक ‘सुपर स्टार’ आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI